नाशिक । प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (Nashik District Badminton Association) आणि केन्सिंग्टन क्लब (Kensington Club) यांच्या वतीने आयोजित 3 र्या बॅडमिंटन लीग (Badminton League) स्पर्धेत नाशिक सुपर किंग (Nashik Super King) आणि निवेक (Nivek) यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात
नाशिक सुपर किंगच्या संघाने 3-3 अश्या बरोबरीनंतर शेवटच्या निर्णायक सामन्यात 2-1 असा विजय मिळवून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर केवळ काही गुणांच्या फरकाने निवेक संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
तब्बल पाच तास चाललेल्या या अंतिम फेरीच्या (final round) सामन्यात बरेच चढ-उतार बघायला मिळाले.या सामन्यातील पुरुषांच्या पहील्या लढतीत निवेकच्या हर्षल टेंभूरणीकर आणि विनायक दंडवते या जोडीने नाशिक सुपर किंग संघांच्या प्रसाद शिवदे आणि तेजस सोमण यांचा 21-12, 21-11 असा पराभव करून निवेक संघाला एक गुण मिळवून देत चांगली सुरवात केली. तर पुरुषांच्या दुसर्या सामन्यात नाशिक सुपर किंगच्या (Nashik Super King) विक्रांत करांजकर आणि अदित गुप्ता यांनी निवेकच्या सिद्धार्थ वाघ आणि रोहित पाटील यांचा 21-08, 21-12 असा सहज पराभव करून आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
त्यानंतर खेळल्या गेलेल्या मुलांच्या 18 वर्षे गटाच्या सामन्यात निवेककडून खेळणार्या राष्ट्रीय खेळाडू पार्थ देवरे (National player Partha Deore) आणि तन्मय राव (Tanmay Rao) आणि नाशिक सुपर किंग संघाच्या कृष्णा मजेठीया आणि ओम अमृतकर यांच्यात झालेल्या सामन्यात पहिला सेट पार्थ आणि तन्मय यांनी 21-15 असा जिंकून 1-0 अशी आघाडी मिळवली. तर दुसर्या सेटमध्ये नाशिक सुपर किंगच्या कृष्णा मजेठीया आणि ओम अमृतकर या जोडीने 20-20 अशी गुणांची बरोबरी केली. त्यानंतर मात्र यश आणि तन्मय यांनी सयायीमणे खेळ करून हा सेट 24-22 असा जिंकून हा सामना ही आपल्या नांवे करून निवेक संघाला पुनः 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर खेळल्या गेलेल्या मिश्र दुहेरीमध्ये मात्र नाशिक सुपर किंगच्या मनोज महाजन आणि पायल जैन या जोडीने निवेक संघाच्या स्वप्नील भामरे आणि निकिता नगराळे यांच्यावर 21-12 आणि 21-06 असा एकतर्फी विजय मिळवून पुनः नाशिक सुपर किंग संघाला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या 95 वर्षावरील गटाच्या सामन्यात निवेक संघाच्या डॉ. शिरीष घन आणि धिरेन तीलवाणी यांनी सुंदर खेळ करून नाशिक सुपर किंगच्या दिपक सोमण आणि संभाजी पाटील यांना 21-12 आणि 21-16 असे पराभूत करून निवेक संघाला पुनः 3-2 अशी आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पडली.
त्यानंतर 75 वर्षे वयोगटामध्ये नाशिक सुपर किंगच्या विक्रांत उगले आणि नीरज पटकी आणि निवेकच्या प्रशांत दुधेडीया आणि अद्वैत संगपाळ यांच्यात खेळल्या गेलेल्या सहाव्या सामन्यात विजयासाठी चांगलाच संघर्ष बघायला मिळाला. यामध्ये पहिल्या सेटमध्ये 20-20 अश्या बरोबरीनंतर विक्रांत उगले आणि नीरज पटकी यांनी शेवटच्या गुणांसाठी चांगले प्रयत्न करून हा सेट 23-21 असा जिंकून आघाडी घेतली, नाशिक सुपर किंगच्या जोडीने आपआपसात चांगला समन्वय साधून हा सेटही 22-20 असा जिंकून आपल्या नाशिक सुपर किंग संघाला 3-3 अशी बरोबरी मिळवून दिली.
नाशिक सुपर किंगच्या मुकेश पवार, विशाल करंजकर विरुद्ध निवेकच्या सुंदर राजन, नितीन वागस्कर यांच्यात खेळल्या गेलेल्या या 85 वर्षे गटाच्या शेवटच्या निर्णायक सामन्यात सर्वात जास्त चुरस दिसून आली. तीसर्या निर्णायक सेटमध्येही मुकेश पवार आणि विशाल करंजकर यांनी हीच लय कायम राखून हा सेट 21- 13 असा जिंकून 4-3 फरकाने आपल्या नाशिक सुपर किंग संघाला या 3 र्या बॅडमिंटन लीग चे विजेतेपद मिळवून दिले.