Tuesday, March 25, 2025
Homeजळगावबहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतीगृहात अमरावतीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतीगृहात अमरावतीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) –

- Advertisement -

येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मुलांच्या वस्तीगृह क्रमांक ३ येथे एका अमरावती जिल्ह्यातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस झाली आहे. या घटनेने विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.

प्रतीक विजयराव गोरडे (वय १९, रा. शिरसगाव कसबा ता. चांदूरबाजार जि. अमरावती) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो विद्यापीठामध्ये मुलांचे वस्तीगृह क्रमांक ३ येथे खोली क्रमांक टी ४४७ येथे दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. तसेच विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी राहत असून प्रतीक गोरडे याचे वडील शिरसगाव कसबा येथे मजुरी काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. प्रतिक हा बुधवार, दि. ११ सप्टेंबर रोजी मुलांनी वस्तीगृहात बसलेल्या गणपती मंडळातील आरतीसाठी आलेला होता. त्यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली.

काही वेळानंतर मुलं जेवणावरून रूमवर परतली. त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. त्यावेळी काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेलया अवस्थेत आढळून आला होता. इतर काही‍ विद्यार्थी मदतीला धावून आले. त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
त्यांच्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. या घटनेची माहिती मिळताच पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयात येऊन विद्यार्थ्यांकडून आत्महत्याबाबत माहिती घेतली. दरम्यान प्रतीक गोरडे याने आत्महत्या का केली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...