Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहसूल आयुक्त कार्यालयावर बहुजन शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन देणार

महसूल आयुक्त कार्यालयावर बहुजन शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन देणार

नाशिक रोड l Nashik road (प्रतिनिधी)

सध्या दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी येत्या (दि. ०४) फेब्रुवारी रोजी येथील महसूल आयुक्त कार्यालयावर बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्याच प्रमाणे नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा व भोर मळा या भागातील शेतकऱ्यांना जमीन महसुलाच्या थकबाकी भरावी म्हणून अनेक शेतकऱ्यांना प्रत्येकी वीस ते पंचवीस लाख रुपये रकमेच्या नोटिसा तहसीलदाराने पाठविल्या आहे.

त्याचा निषेध म्हणून या नोटिसांची होळी करण्यात आली. या प्रसंगी डॉ. डी एल कराड, रमेश आवटे, राजू देसले, अशोक खालकर, निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, मनोहर कोरडे, योगेश भोर, स्वरूप वाघ, हिरामण तेलोरे, अँँड. दत्ता गायधनी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या