Sunday, June 14, 2026
HomeनगरAhilyanagar : ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातून 111 गुन्हेगार हद्दपार

Ahilyanagar : ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातून 111 गुन्हेगार हद्दपार

पोलिसांची कडक तयारी || 33 अधिकारी, 360 पोलिसांचा बंदोबस्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बकरी ईद सण शांततेत, सुव्यवस्थेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा यासाठी अहिल्यानगर शहर उपविभाग पोलिसांकडून व्यापक तयारी करण्यात आली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. 111 सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

- Advertisement -

बकरी ईदच्या अनुषंगाने पोलिसांनी शहर उपविभागात एकूण 237 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधितांकडून बंधपत्र घेण्यात आले असून अवैध दारूविक्री करणार्‍या 7 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोन जणांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी 16 शांतता समिती, मोहल्ला कमिटी, जातीय सलोखा समिती तसेच धर्मगुरूंच्या बैठका घेऊन नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. अवैध जनावरे व मांस वाहतुकीवर देखील पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

सन 2026 मध्ये दाखल असलेल्या 31 गुन्ह्यांमधील एकूण 66 आरोपींवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संघटित स्वरूपात गुन्हे करणार्‍या दोन टोळ्यांवर बीएनएस कलम 111 अन्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोंबिंग ऑपरेशन, दंगाकाबू योजना, रूट मार्च आणि मॉब ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. संवेदनशील भागांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांव्दारे बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बकरी ईददरम्यान शहरातील ईदगाह मैदान, मशिदी, मिश्र लोकवस्ती, संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात आला आहे. यामध्ये 33 अधिकारी, 360 पोलीस अंमलदार, 1 आरसीपी प्लाटून, 1 एसआरपी प्लाटून तसेच 155 होमगार्ड यांचा समावेश असणार आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...