Wednesday, January 7, 2026
HomeनगरSangamner : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप म्हणाले, संगमनेरमध्ये साडेनऊ...

Sangamner : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप म्हणाले, संगमनेरमध्ये साडेनऊ हजार…!

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर मतदारसंघात (Sangamner Constituency) साडेनऊ हजार बोगस मतदारांची नोंद (Bogus Voters Register) आहे. यामधील अनेकजणांची दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांची देखील नावे असल्याने निवडणूक आयोग (Election Commission) बनवाबनवीचा प्रकार करतोय का अशी शंका मनात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे लक्ष्मीपूजन केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर आरोप (Accusation) केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, साडेनऊ हजार बोगस मतदारांची नोंद असल्याचे आम्ही दाखवून दिले. याबाबत कोणतीही पडताळणी केलेली नाही. या संदर्भात तहसीलदारांना त्यांनी विचारले असता अशी कोणतंही नाव वगळणे आणि दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हांला नसल्याचे सांगितले.

YouTube video player

एका बाजूला तुम्ही सांगतायेत आम्ही चुका दुरुस्त करण्याचे आदेश दिलेय आणि दुसरीकडे म्हणतायेत आम्हांला अधिकारच नाही. यावरुन अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग अधिकार्‍यांच्या माध्यमातून करतोय का अशी शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर विरोधी पक्षाने आरोप (Accusation) केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आयोग आणि विरोधी पक्ष कशी भूमिका घेतात हे पाहणंही यानिमित्ताने महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...