Wednesday, October 9, 2024
Homeनगरअवजड वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

अवजड वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

बालिकाश्रम रस्त्यावरील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बालिकाश्रम रस्त्यावर (Balikashram Road) सर्वोदय कॉलनीत सायकलला अवजड वाहनाच्या बसलेल्या धडकेत अथर्व हरीशकुमार वेताळ या विद्यार्थ्यांचा मृत्यू (Heavy Vehicle Hit Student Death) झाला. सोमवारी (1 ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना घडली. नगर-कल्याण रस्त्यावरील (Nagar-Kalyan Road) हॅपी थॉट्स परिसरातील समतानगर येथील विद्यार्थी अथर्व वेताळ (इयत्ता सातवी, रेसिडेन्सीयल हायस्कूल) हा सोमवारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना त्याला अवजड वाहनाची धडक (Heavy Vehicle Hit) बसली व त्यात त्याचा मृत्यू (Death) झाला.

- Advertisement -

त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर कल्याण रस्ता परिसरातील शिक्षक, नागरिकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. तेथे त्याच्या अपघाती (Accident) निधनाने हळहळ व्यक्त होत होती. रात्री उशिरा नगरच्या अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अथर्वचे वडील हरीशकुमार वेताळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा (ता. कर्जत) येथे शिक्षक आहेत. यावेळी कल्याण रस्ता परिसरातील पारूनाथ ढोकळे यांनी दिल्ली गेट परिसर, सिध्दीबाग परिसर, नेप्ती नाका येथे वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक होणे गरजेचे आहे तसेच शहरात अवजड वाहतुकीला बंदी असताना शहरात अवजड वाहने कशी येतात याचीही पोलीस प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या