Thursday, May 2, 2024
Homeनाशिकप्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापराल तर याद राखा

प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापराल तर याद राखा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा (National flag) योग्य मान राखला जावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आजपासून (दि.२१) ते 31 जानेवारीर्यंत प्लास्टिकचा (Plastic) वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करण्यावर बंदी (Banned) घालण्यात आली आहे….

- Advertisement -

जिल्ह्यात नाशिक पोलीस आयुक्त यांची हद्द वगळून संपूर्ण नाशिक ग्रामीण परिक्षेत्रात ही बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे (Bhagwat Doiphode) यांनी दिले आहेत.

Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा यासंदर्भात शासनाने सुचना निर्गमित केल्या आहेत. राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडाप्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इकडे-तिकडे टाकले जातात.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

हे दृष्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोध चिन्हे व नावे ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध असल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या