Friday, May 3, 2024
Homeनगरकिरकोळ कारणातून दोघांना मारहाण; बाप-लेकावर गुन्हा

किरकोळ कारणातून दोघांना मारहाण; बाप-लेकावर गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चिकन दिले नाही म्हणून दुकान मालकासह कामगाराला दोघांनी मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये रविवारी (दि. 30) सायंकाळी घडली. याप्रकरणी शाम विरेंद्र त्रिवेदी (वय 33 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सिध्दार्थ उर्फ दाउद जाधव (पूर्ण नाव माहिती नाही) व शारून सिध्दार्थ जाधव (दोघे रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शेख मुक्तार मेहरू यांचे गांधीनगरमध्ये अंडा भुर्जी व चिकनचे दुकान असून त्यावर शाम त्रिवेदी कामगार आहेत. रविवारी सायंकाळी सिध्दार्थ व त्याचा मुलगा शारून दुकानावर आले होते. सिध्दार्थ याने त्रिवेदी यांच्याकडे चिकनची मागणी केली असता ते म्हणाले, दुकानावर गर्दी असून थोड्यावेळ थांबा. सिध्दार्थ याला राग आल्याने त्याने त्रिवेदीसह दुकानाचे मालक शेख यांना मारहाण करून जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या