Monday, May 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजतुळजापुर-औसा महामार्गावर भीषण अपघात; बीड माजलगावचे माजी आमदार आर.टी.देशमुख यांचे अपघाती निधन

तुळजापुर-औसा महामार्गावर भीषण अपघात; बीड माजलगावचे माजी आमदार आर.टी.देशमुख यांचे अपघाती निधन

बीड | Beed
राज्यात रोज रस्ते अपघातांमध्ये अनेकांचे प्राण गेल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. गेल्या काही दिवसांत सातत्याने अपघाताचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. आता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. तुळजापूर -औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, या अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे, आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बीड माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीचा तुळजापूर-औसा महामार्गावर भीषण असा अपघात झाला. औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ त्यांच्या गाडीचा अपघात घडल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत चालक आणि अंगरक्षकही होते. ते दोघे ही जखमी झाले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर या अपघाताची पोस्ट टाकत श्रध्दांजली अपर्ण केली.

आर.टी. देशमुख हे फॉर्च्युनर गाडीने तुळजापूर औसा, लातूर मार्गे बीडला जात होते. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग ३६१वर पाणी साचले होते. बेलकुंड येथील उड्डाणपुलावरुन उतरत असताना त्या पाण्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर गाडीने पाच ते सहा वेळा पलटी खाल्ली. यावेळी आर.टी. देशमुख गाडीबाहेर फेकले गेले त्यानंतर गाडी आर. टी. देशमुख यांच्या अंगावर पडली. देशमुख हे गाडीखाली अडकले होते. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्यांच्या अंगावरील गाडी हटवण्यात आली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान, त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडेंनी तत्काळ आपले कार्यक्रम रद्द करुन लातूरला रवाना झाल्या आहेत. आर.टी. देशमुख यांचे निधन झाल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

२०१४ मध्ये माजलगाव मतदारसंघातून आर. टी. देशमुख यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत बाजी मारली. त्यांनी तीन टर्मचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांचा ३७ हजार २४५ मतांनी पराभव केला. आर. टी. देशमुख यांनी १ लाख १२ हजार ४९७ मतं घेतली. सोळंके यांना केवळ ७५ हजार २५२ मतं मिळाली. २०१९ मध्ये माजलगावातून भाजपने रमेशराव कोकाटे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या सोळंके यांनी कोकाटे यांचा १२ हजार ८९० मतांनी पराभव केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी आकाश अंबानी पाचव्यांदा साई चरणी

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी साईबाबा समाधीचे दर्शन (Sai Baba Samadhi...