Saturday, September 12, 2026
Homeक्राईमShrirampur : बेलापुरात बेकायदेशीर खासगी सावकारी

Shrirampur : बेलापुरात बेकायदेशीर खासगी सावकारी

मनीष मुथा व सुनिल मुथा विरोधात गुन्हा दाखल; शहर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर येथे सावकारकीचा परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या सावकारी करणार्‍या मनीष मुथा व सुनिल मुथा (दोघेही रा. बेलापूर) यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. शहर परीसरात जुन्या वाहनांच्या वाहन बाजारात मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहने उभी करुन ठेवलेली असल्याने, गेल्या आठवड्यात शहर पोलिसांकडून वाहन बाजारातील वाहनांची तपासणी करण्यात आली होती. या वाहनांची खात्री करत असताना तक्रारदार रोहीत संतोष भालेकर (रा. बेलापूर रोड, बजरंगनगर, वार्ड नं. 07, श्रीरामपूर) यांनी दि. 14 नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात मनीष मुथा व सुनिल मुथा यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी करुन त्यांची मोटरसायकल गहाण ठेवून घेतल्याबाबत व ज्यादा व्याज व मुद्दलाची मागणी केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता.

- Advertisement -

या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, श्रीरामपूर) यांच्याशी पत्रव्यवहार करून, मनीष मुथा व सुनिल मुथा यांच्याकडे सावकारी कर्ज देण्याबाबच्या परवाना आहे का? याबाबत विचारणा केली असता, सहाय्यक निबंधकांनी मनीष मुथा व सुनिल मुथा यांच्याकडे सावकारी कर्ज देण्याबाबच्या कोणताही परवाना नसल्याचे पत्राद्वारे कळविले होते. याप्रकरणी रोहीत संतोष भालेकर यांच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मनीष मुथा व सुनिल मुथा (दोघेही रा. बेलापूर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 308 (2) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39, 44 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहे.

अशाप्रकारे दुचाकी व चारचाकी वाहने अगर अन्य मालमत्ता बेकायदेशीरपणे तारण म्हणून ठेऊन, नियमबाह्य व्याज घेऊन बेकायदेशीर सावकारी कोणी करीत असल्यास त्याविरोधात तात्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १२ सप्टेंबर २०२६ – शेतकरीवर्गासाठी कडवट निर्णय

0
भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा अभिमान आपण बाळगतो; परंतु देशाच्या अर्थकारणात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अन्नदाता असलेला शेतकरी नेहमीच दुर्लक्षित राहतो. शेतकर्‍याने उत्पादित केलेला कांदा...