Saturday, May 4, 2024
Homeनगरनेवाशाची भालेराव टोळी नगर जिल्ह्यातून हद्दपार

नेवाशाची भालेराव टोळी नगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर | Ahmedagar

खुन, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेली रवी राजु भालेराव टोळी अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांकरीता (18 महिने) हद्दपार करण्यात आली आहे.

- Advertisement -

रवी भालेरावसह सात गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे. नेवासा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंजुरी देत हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

Hina Khan : हिनाचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ

टोळीप्रमुख रवी राजु भालेराव (वय 32), टोळीसदस्य शंकर ऊर्फ दत्तू अशोक काळे (वय 32), निखील किशनलाल चंदानी (वय 27), रवी ऊर्फ रवींद्र शिवाजी शेरे (वय 28), शिवा अशोक साठे (वय 29 सर्व रा. नेवासा फाटा ता. नेवासा), सतिष लक्ष्मण चक्रनाराण (वय 26), नितीन ऊर्फ मुन्ना असिफ महम्मद शेख (वय 32, दोघे रा. नेवासा खुर्द ता. नेवासा) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. नेवासा व परिसरात रवी भालेराव टोळीने शरिराविरूध्द गंभीर गुन्हे करून दशहत निर्माण केली होती.

अग्नी शस्त्र जवळ बाळगूून खुन करणे, दरोडा टाकणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, अनाधिकाराणे घरात प्रवेश करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, सरकारी आदेशाचा अवमान करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे भालेराव टोळीविरूध्द दाखल होते.

IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ संघात होणार पहिला सामना

गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असलेल्या भालेराव टोळीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपार करण्यात यावे, असा प्रस्ताव नेवासा पोलिसांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता.

भालेराव टोळीविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याने नमुद गुन्ह्याची व टोळी प्रमुख व टोळीसदस्यांनी सविस्तर सर्वकश चौकशी करून टोळीपासून नेवासा पोलीस ठाणे हद्दीत व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व टोळीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी भालेराव टोळीतील सात जणांना दीड वर्षांकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

- Advertisment -

ताज्या बातम्या