Wednesday, October 9, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळात पाण्याची आवक घटली

भंडारदरा, मुळात पाण्याची आवक घटली

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात शुक्रवारपासून पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये येणारी आवकही कमी झाली आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत 139 दलघफू पाणी भंडारदरात आले. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 4632 दलघफू (41.96टक्के) झाला होता. निळवंडेत 1559 दलघफू (18.32 टक्के) आहे.गत 24 तासांत पडलेला पाऊस असा मिमीध्ये भंडारदरा 3, घाटघर 38, पांजरे 23, रतनवाडी 27. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात कोतूळ व हरिश्चंद्रगड परिसरातही पाऊस कमी झाला. सायंकाळी विसर्ग 1440 क्युसेक झाला होता.

- Advertisement -

डिंभेतील पाणीसाठा 22 टक्क्यांवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्प धरणांच्या पाणलोटात गत तीन दिवसांपासून पावसाने काहीसा जोर पकडल्याने धरणांमध्ये आवक होत आहे. सर्वाधिक क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा 22 टक्क्यांवर गेला आहे. जून महिन्यात या धरणातील पाणीसाठा केवळ 4 टक्के होता. त्यामुळे या भागात पाणीबाणीची परिस्थिती झाली होती. परवा कुकुडी समूह धरणांत 750 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले होते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आवकेत काल काहीशी घट झाली. 332 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 4729 दलघफू (15.93टक्के) झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पाणीसाठा आहे. गतवेळी 3637 दलघफू पाणी होते.

दारणा निम्मे भरण्याच्या मार्गावर

493 दलघफू नवीन पाणी दाखल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने दारणात दूरवरून पाणी वाहत येत आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणात 493 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. या हंगामात दारणात 3 टीएमसीहून अधिक नवीन पाणी दाखल झाले. हे निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला आहे. काल सकाळी 6 वाजता दारणा धरण 47.03 टक्क्यांवर पोहचले आहे. या धरणात काल मंगळवारी सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत 493 दलघफू नविन पाणी दाखल झाले. काल सकाळी 6 पर्यंत दारणाच्या भिंतीजवळ 11 मिमी, इगतपुरीला 8 मिमी, घोटीला 4 मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र दूरवरुन धरणात पाणी वाहुन येत आहे. धबधबे वाहत आहेत. त्यामुळे पाण्याची आवक सुरु आहे.

भावली 57.04 टक्के भरले आहे.1434 क्षमतेच्या या धरणात 818 दलघफू पाणीसाठा आहे. काल या धरणात 63 दलघफू पाणी 24 तासांत दाखल झाले. भावलीला काल सकाळ पर्यंत 12 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणे धरणात 14.78 टक्के, वाकी 9.23 टक्के, भाम 44.20 टक्के, वालदेवी 21.62 टक्के असा पाणी साठा झाला आहे. गंगापूर धरणाचा साठा 33.66 टक्के इतका झाला आहे. या धरणाच्या परिसरातही पावसाचा जोर मंदावला आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात पावसाने पुर्णता उघडीप दिली होती. कश्यपी, गौतमी गोदावरी परिसरातही हीच अवस्था आहे. कश्यपीत 11.93 टक्के, गौतमीत 27.30 टक्के, कडवा 40.17 टक्के, आळंदी 2.82 टक्के.

- Advertisment -

ताज्या बातम्या