Monday, January 26, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा धरण 55 तर निळवंडे 47 टक्के भरले

Bhandardara : भंडारदरा धरण 55 तर निळवंडे 47 टक्के भरले

शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांच्या गर्दीने परिसर फुलला

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने नवीन पाण्याची आवकही घटली आहे. रविवारी (दि. 29) सायंकाळी 6 वाजता 11 हजार दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6079 दलघफू (55.07 टक्के) तर निळवंडेचा 3897 दलघफू (46.79 टक्के) झाला आहे. आढळा धरणाचा पाणीसाठाही 949 दलघफू (89.53 टक्के) झाला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने डोंगदर्‍यांवरुन खळाळत येऊन धरणात विसावणार्‍या नवीन पाण्याचा वेग घटला आहे. परिणामी, पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यानुसार भंडारदरा धरणात गेल्या 24 तासांत (रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) 126 दलघफू तर निळवंडेत 76 दलघफू नवीन पाणी जमा झाल्याची नोंद झाली आहे. आता जून महिना सरत आला असून जुलै महिन्यात पावसाने धूमशान केले तर दोन्ही धरणे लवकरच भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

YouTube video player

दरम्यान, पावसाची संततधार सुरू असल्याने निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. हा अद्भूत नजारा बघण्यासाठी शनिवार व रविवार अशी सलग सुट्टी साधून पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. धो धो कोसळणार्‍या धबधब्यांत मनसोक्त भिजण्याचा आनंद घेताना दिसून आले. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. वातावरणात कमालीचा गारवा असल्याने जनजीवन आणि पशुधन गारठत असल्याने आदिवासी शेतकरी शेकोट्या पेटवून ऊब घेत आहे.

गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
भंडारदरा 20, घाटघर 30, पांजरे 23, रतनवाडी 27, वाकी 14, निळवंडे 11, आढळा 06, अकोले 08

ताज्या बातम्या

नाशिककरांच्या प्रतिसादाने ‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ हाऊसफुल्ल!

0
​नाशिक | प्रतिनिधी Nashik ​दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’मध्ये प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी सुटीचा मुहूर्त साधत नाशिककरांनी ब्रम्हेचा इस्टेट येथे गर्दी केली. उद्या...