Saturday, August 1, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत 'एवढा' पाणीसाठा

Bhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

अतिवृष्टीमुळे भातरोपे, बांधांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरण पाणीसाठा 6474 दलघफू (58.65 टक्के) झाला होता. या भागात पाऊस थांबला असलातरी पाण्याची आवक सुरूच असल्याने रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा रात्री उशीरा 60 टक्क्यांवर पोहचला होता. आज सकाळी 10 वाजेपर्यंत हा पाणीसाठा 65 टक्क्यांवर पोहचलेला असेल.

- Advertisement -

वाकीचा 5310 क्युसेकपर्यंत वाढलेला विसर्ग तसेच अन्य येणारे पाणी प्रवरा नदीत जमा होत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात 2759 दलघफू (33 टक्के) झाला होता. काल दुपारनंतर पावसाचा वेग कमालीचा मंदावला असल्याने धरणाकडे येणारी आवकही आता मंदावू लागली आहे. दरम्यान, गत तीन दिवसांत धो धो पाऊस झाल्याने पाणलोटात मोठ्या प्रमाणात भात रोपे व बांधांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. इतरही नुकसान आहे. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

मुळाचा साठा 9074 दलघफू

मुळा नदीचा विसर्ग घटला

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण पाणलोटातील अकोलेतील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात अतिवृष्टी होत असल्याने मंगळवारी दुपारपासून अकोलेतील मुळा नदीला पूर होता. पण आता पावसाचा जोर ओसरल्याने पूरही घटला.सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग केवळ 6951 क्युसेक होता. पण धो धो पाऊस कोसळत असल्याने सकाळी 9 वाजता तो 27165 क्युसेकपर्यंत वाढला. दुपारी 3 वाजता हा विसर्ग 26516 क्युसेक होता. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हा विसर्ग 8373 क्युसेक पर्यंत खाली आला होता. रात्री 9 वाजता कोतूळ येथील विसर्ग 11152 क्युसेक होता.

तर पाणीसाठा 9074 दलघफू आहे. दरम्यान, पुरामुळे लहीत खुर्द-लहीत बुद्रुक जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही गावांमधील संपर्क पूर्णपणे खंडित झाला होता. पुराचे पाणी कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. पण तो कमी झाला आहे. तसेच शेती जलमय झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतात अजूनही पाणीच पाणी असून ते बाहेर काढण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. भातरोपांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कुकडीत दोन दिवसात 7023 दलघफू पाणी दाखल वडज, येडगाव ओव्हरफ्लो, डिंभे निम्याच्या मार्गावर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट क्षेत्रात गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पाच्या पाण्यासाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत प्रकल्पातील धरणांत उपयुक्त पाणीसाठा 11608 दलघफू (40 टक्के) झाला होता. दरम्यान, गत दोन दिवसांत कुकडी प्रकल्पात तब्बल 7023 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे दिलासादायक पाणीसाठा झाला आहे. 2 तारखेला या प्रकल्पात केवळ 1750 दलघफू (5.90टक्के) होता. धरणं कोरडी असल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण त्यानंतर निसर्गराजानं मेहरबानी केली नी धो धो पाऊस बरसला त्यामुळे कालपर्यंत पाणीसाठा 40 टक्क्यांवर पोहचला होता.

गतवर्षी या धरणात पाणीसाठा 13735 दलघफू (46.28 टक्के) होता. सोमवारी सायंकाळी संपलेल्या 34 तासांत 1731 दलघफू विक्रमी पाणी नव्याने दाखल झाले.त्यामुळे समहू धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 4780 दलघफू (16.11 टक्के) झाला होता. काल मंगळवारी संपलेल्या 24 तासांत विक्रमी 3094.61 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे या प्रकल्पातील पाणीसाठा 6258.41 दलघफू (21.09 टक्के) झाला होता. काल दुपारी यात आणखी 1238.87 दलघफू नवीन पाण्याची भर पडली. त्यामुळे हा पाणीसाठा 7181.15 दलघफू (24.20टक्के) झाला होता. काल बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत 4415.69 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. साठा 10111 दलघफूवर पोहचला होता. पाण्याची आवक सुरूच असल्याने दुपारी 4 वाजेपर्यंत आणखी 2481 दलघफू पाणी दाखल झाले. उपयुक्त साठा 11602 दलघफू (39 टक्के) झाला होता. त्यानंतर पुन्हा 200 दलघफू पाणी दाखल झाले.

कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या डिंभेत बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 588 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा 5566 दलघफू (44.15 टक्के) झाला. वडज धरण मंगळवारीरात्रीच ओव्हरफ्लो झाल्याने या धरणाच्या सांडव्यातून बुधवारी 10000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्या पाठोपाठ येडगाव धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. या धरणातील पाणीसाठा 87.54 टक्के होता. हे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे.

डिंभे धरण – 44.15 टक्के
येडगाव – 87.54 टक्के
माणिकडोह – 31.83 टक्के
वडज – 97.14 टक्के
चिल्हेवाडी – 80.24 टक्के
घोड – 14.59 टक्के

ताज्या बातम्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : ‘ज्यूदो’त भारताची सुवर्ण झेप; अस्मिता डे आणि...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या ज्यूदोपटूंनी इतिहास रचत देशाच्या पदकसंख्येत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता...