Friday, September 25, 2026
HomeनगरBhandardara dam : भंडारदरा धरणाचे नाव बदलले! आता 'या' नावाने ओळखले जाणार

Bhandardara dam : भंडारदरा धरणाचे नाव बदलले! आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

अहमदनगर | प्रतिनिधी

निसर्गाचे वरदान लाभलेल्या भंडारदरा जलाशयाचे नाव बदलण्यात आले आहे. भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

जलाशयाच्या नामकरणासाठी अनेक अर्ज शासनाला प्राप्त झाले होते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णयात म्हंटले आहे कि, “जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सदर जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”

त्यानंतर आज भंडारदरा जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...