Tuesday, February 3, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा, दारणा पाणलोटात आषाढसरी

Bhandardara : भंडारदरा, दारणा पाणलोटात आषाढसरी

रतनवाडीत 4 इंच पाऊस || धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आदी परिसरात दमदार आषाढ सरी कोसळू लागल्याने धरणात नवीन पाण्याची आवकही कमालीची वाढली आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6732 दलघफू (60.58 टक्के) तर निळवंडेचा 4258 दलघफू (51.13 टक्के) झाला आहे. आढळा धरणही लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, 991 दलघफू (93.49 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून पाणलोटक्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहे. यामुळे उंचावरुन वाहून येणारे पाणी वेगाने धरणाच्या पोटात विसावत असल्यामुळे धरणाचे पोट विस्तारत आहे. गेल्या 24 तासांत (मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा धरणात 359 दलघफू नवीन पाणी जमा झाले. तर निळवंडेत 179 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. तसेच वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने कृष्णावंती नदी वाहती आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनी भंडारदरा धरण भरण्याचा प्रघात आहे. यावर्षी जुलै महिन्यातच दोन्ही धरणे ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

YouTube video player

24 तासांत पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

भंडारदरा 72, पांजरे 83, रतनवाडी 102, आढळा 04, घाटघर 85, वाकी 68, निळवंडे 38, अकोले 24

जायकवाडी जलाशयात 60 टीएमसी

गोदावरीतील विसर्ग रात्रभर बंद

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणा धरणाच्या पाणलोटात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्या तुलनेत गंगापूरच्या पाणलोटात पावसाच्या हलक्या सरींचे आगमन होत होते. दरम्यान, जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्त साठा 44.64 टक्के इतका झाला होता. दरम्यान, नांदुर-मधमेश्वर बंधार्‍यातून काल दुपारी 3 वाजता गोदावरीतील विसर्ग रात्रभर बंद करण्यात आला आहे.

काल दिवसभर दारणा धरणाच्या भिंतीजवळ पाऊस मध्यम स्वरूपाचा पडत होता. मात्र, धरणाच्या पाणलोटातील इगतपुरी आणि घोटी परिसरात पावसात जोर होता. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी चांगला पाऊस घाटमाथ्यावर पडत होता. काल सकाळपर्यंत दारणा धरणात 24 तासात 134 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दारणा धरण 52.04 टक्क्यांवर स्थिर आहे. नवीन येणारे पाणी विसर्गाच्या स्वरूपात बाहेर टाकले जात आहे. दारणा धरणात 1 जूनपासून सुमारे 5 टीएमसी पाण्याची आवक झाली, तर 3.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शेजारील भावली 89 टक्क्यांवर पोहचले आहे. 100 टक्के झाल्यावर त्यातून विसर्ग सुरू होईल.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. या धरणाचा साठा 57.35 टक्के झाला आहे. गंगापूर धरणातून 1360 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणातून 2.3 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. नांदुर-मधमेश्वर बंधार्‍यातून काल दुपारी 3 वाजता गोदावरीतील विसर्ग रात्रभर बंद करण्यात आला आहे. आज सकाळी बंधार्‍याची लेव्हल आल्यानंतर पुन्हा सुरू होईल. पाणीसाठी बंधार्‍याचे गेट पूर्णतः वर करण्यात आले होते.

काल सकाळपर्यंत या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 13 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जायकवाडीत काल सायंकाळच्या आकडेवारीनुसार मृतसह एकूण साठा 60.30 टक्के इतका साठा आहे, तर उपयुक्त साठा 34.30 टक्क्यांवर पोहचला आहे. उपयुक्त साठा 44.64 टक्के इतका झाला आहे.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....