Tuesday, February 3, 2026
HomeनगरBhandardara : घाटघर, रतनवाडीत धुवाँधार पाऊस

Bhandardara : घाटघर, रतनवाडीत धुवाँधार पाऊस

भंडारदरा 339 दलघफू तर निळवंडेत 216 दलघफू नवीन पाणी

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

निसर्गाचं वरदान असलेल्या भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचे तांडव सुरू असल्याने धरणात येणार्‍या नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे बुधवारी (दि. 2) सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7 हजार 38 दलघफू (63.76 टक्के) तर निळवंडेचा पाणीसाठा 4 हजार 429 दलघफू (53.18 टक्के) झाला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून पाणलोटक्षेत्रात आषाढ सरींनी चांगलाच फेर धरल्याने डोंगरदार्‍यांवरून पाणी वेगाने धरणाकडे झेपावत आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत (बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा जलाशयात 339 दलघफू तर निळवंडेत 216 दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. याचबरोबर देवठाण येथील आढळा धरणाचा पाणीसाठाही बुधवारी सायंकाळी 96.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, जोरदार पाऊस कोसळत असल्याने भात रोपे पाण्याखाली गेली आहेत.

YouTube video player

24 तासांत पडलेला पाऊस (आकडे मिमीमध्ये)

भंडारदरा 60, घाटघर 140, रतनवाडी 129, निळवंडे 11, पांजरे 95, वाकी 52, आढळा 07, अकोले 06

मुळा धरणात 13 हजार 587 दशलक्ष घनफूट पाणीसाठा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक चांगली सुरू झाली आहे. मुळा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 13 हजार 587 दलघफू झाला असून आवक 7 हजार 310 क्युसेसने सुरू होती. मुळा धरणाने 50 टक्केचा टप्पा ओलंडला आहे. त्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने मुळा नदीपात्रातून धरणात काल मोठी आवक सुरू होती.

मुळा धरणात गेल्या 24 तासात 589 दलघफू व आतापर्यंत 4 हजार 681 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे 26 हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 13 हजार 587 दलघफू वर पोहचला आहे.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....