Monday, May 4, 2026
HomeनगरBhandardara : पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग वाढले!

Bhandardara : पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग वाढले!

अकोले, भंडारदरा |प्रतिनिधी| Akole | Bhandardara

काल दुपारपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोमवारी (दि.25) सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून 13 हजार 418 क्युसेक तर निळवंडेतून 13 हजार 845 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू होता. यामुळे नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणात पाण्याची आवक होत आहे. काल भंडारदरा धरणातील पाणीसाठा 100 टक्के झाला. पाऊस वाढल्याने
पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून 13 हजार 418 क्युसेक करण्यात आला होता. त्यासाठी भंडारदरा सांडव्याची दारे पुन्हा वर उचलण्यात आली. सांडव्यातून 12 हजार 598 क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून 820 क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्रात पडत होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात निळवंडे धरणात येत असल्यामुळे निळवंडेचा विसर्गही 13 हजार 344 क्युसेक करण्यात आला.

याशिवाय निळवंडेच्या कालव्यातून 500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे प्रवरेच्या पाणी पातळीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर तालुक्याच्या पूर्व भागातील दिवसभर पाऊस सुरू होता. भंडारदरा येथे दिवसभराच्या बारा तासांत 45 मिमी, पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणातून जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते तेव्हा अकोले येथील अगस्ति सेतू पुलावर पाणी येते. त्यामुळे नगरपंचायतीच्यावतीने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जातो. मात्र काहीजण पुलावरील पाणी थोडे कमी होताच बेरीकेट्स बाजूला करून पुलावरून प्रवास करतात, अशा लोकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, कोतुळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातही काल सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा वाढल्याने मुळा धरणातील विसर्गही वाढविण्यात आला आहे. मुळा धरणात सायंकाळी 25503 दलघफू साठा असून कोतूळ येथील विसर्ग 3212 क्युसेक आहे. पण सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढल्याने मुळा धरणात पाण्याची आवक वाढली. दुपारी 4 वाजता मुळा धरणातून खाली मुळा नदीत विसर्ग वाढविण्यात येऊन तो 2500 क्युसेक करण्यात आला. त्यानंतरही आवक वाढत असल्याने रात्री 9 वाजता हा विसर्ग आणखी वाढविण्यात येऊन 5000 क्युसेक करण्यात आला आहे.

गोदावरी विसर्ग वाढवला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल सकाळपासून दारणा तसेच गंगापूर धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू असल्याने या दोन्ही धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 12620 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दोन दिवस पावसाचे हलका हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. काल सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली. धरणातील जलसाठा 95% च्या पुढे असल्याने नवीन होणारी पाण्याची आवक वाढत असल्याने धरणामधून विसर्ग केला जात आहे.

काल सायंकाळी गंगापूर धरणातून 1889 क्युसेकने निसर्ग करण्यात येत होता त्यात संध्याकाळी सात वाजता 1126 ने वाढ करून विसर्ग 3025 क्युसेस इतका करण्यात आला. दारणा धरण पाणलोटातही पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाचा विसर्ग ही 6108 क्युसेस करण्यात आला. दारणा धरण समूहातील भाम धरणातून 2093 तर भावलीतून 588 क्युसेस वेगाने पाणी सोडले जात आहे. मुकणे धरणातून 726 क्युसेक, वाकी 995 क्युसेक, पालखेड 1592 क्युसेक, गौतमी 575 क्युसेक, कश्यापी 640 क्युसे, आळंदी 87 क्युसेक, वाघाड 767 क्युसेक, तिसगाव 68 क्युसेक, करंजवन 1130 क्युसेक, असे विसर्ग सुरु आहेत.

वरील धरणांचे विसर्ग नांदूर मधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी 12,620 क्युसेस विसर्ग सुरू आहे. काल सकाळपर्यंत गोदावरीतुन जायकवाडीच्या दिशेने सुमारे 54 टीएमसी पाण्याचा निसर्ग करण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून 13,344 क्युसेक, तर निळवंडे धरणातून 15,357 क्युसेक पाणी सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, ओझर बंधार्‍यावरूनही 6,301 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस असाच सुरू राहिल्यास विसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

धरणातून सोडलेला विसर्ग (आकडे क्युसेकमध्ये)

भंडारदरा 13418, निळवंडे 13845, मुळा 5000, गोदावरी 12620

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...