Monday, November 9, 2026
HomeनगरBhandardara : पाणलोटात पाऊस, भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

Bhandardara : पाणलोटात पाऊस, भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

मुळा पाणलोटातही जोरदार हजेरी

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात रविवारी रात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नवीन पाण्याची जोरदार आवक होत असल्याने या धरणातून प्रवरा नदीत 3147 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. पाऊस सुरू झाल्याने ऐन दुष्काळसदृश परिस्थितीत पाणलोट आणि लाभक्षेत्राला काहिसा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

गत 20-25 दिवसांपासून पाणलोटातून पाऊस गायब होता. पण रविवारी रात्री नूर बदलला आणि हळूवार पावसास सुरूवात झाली. त्यानंतर या पावसाने वेग घेतला. रतनवाडीत तर जोरदार पाऊस कोसळत होता. काल सोमवारीही दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे भातपिकांसह अन्य पिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे डोंगर दर्‍यांमधून धबधबे कोसळू लागले. ओढे नाले खळखळत धरणाच्या पाण्यात विसावू लागले. वाकी तलावातही आवक वाढल्याने त्यातून 98 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे.

11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण तुडूंब असल्याने काल सायंकाळी या धरणातून 3147 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले. हे पाणी निळवंडेत जमा होत असून या धरणातील पाणीसाठा 8017 दलघफू असून 1469 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत नोंदविला गेलेला पाऊस असा- (मिमी) भंडारदरा 28, निळवंडे 40, रतनवाडी 56, घाटघर 30, पांजरे 14, वाकी 30.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, रविवारी रात्री मुळा पाणलोटात काही भागात काही काळ जोरदार पाऊस कोसळला. काल सोमवारी रात्री 8 वाजेनंतर पावसास जोरदार सुरूवात झाली होती. त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसाही अधून मधून पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुळा नदीतील विसर्गही काहीसा वाढला आहे.

ताज्या बातम्या

Rahata : कोल्हारमध्ये भर बाजारपेठेत गोडाऊनला आग

0
कोल्हार |वार्ताहर| Kolhar एकीकडे दीपावलीच्या सणाच्या धामधुमीत सर्वजण असताना कोल्हार बुद्रुक येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ भर मार्केटमध्ये मध्यवर्ती ठिकाणी सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक एका...