Sunday, November 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: "सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम हलकारे देत निघाली"; राज ठाकरेंची पवारांवर...

Raj Thackeray: “सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम हलकारे देत निघाली”; राज ठाकरेंची पवारांवर टीका, म्हणाले, दिगू टिपणीस…

मुंबई | Mumbai
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेने राजकीय भूकंप झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेला काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट शरद पवारांवरच पाठीत खंजीर खुपसल्याची जाहीर टीका केली. दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. ट्वीट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यात घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यातच काँग्रेसकडे जोरदार टीका केली जात आहे. शरद पवारांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचा मोठा आरोप काँग्रेसने केला. यावरुन आता राज ठाकरेंनी देखील शरद पवारांवर टीका केली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले, २ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं, असो.

२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो.

I had mentioned this back on July 2, 2023, when a faction of the Nationalist Congress Party (NCP) broke away and moved toward the BJP. For the next three years, both factions of the NCP staged a convincing charade of conflict; and now, just as I had predicted, another faction is on the move—seeking to climb the rungs of power. I once remarked that this is all part of Pawar’s ‘Jantar Mantar’. Something only a very few people truly understand. Anyway.— Raj Thackeray (@RajThackeray) November 28, 2026

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!

विधेयक मंजूर करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याचं काम सुरु; डिलिमीटेशनवरुन मल्लिकार्जून खर्गेंचा सरकारवर घणाघात

तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रखडलेल्या पाणी योजनांना 350 कोटींचे बळ!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने आता रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र...