Saturday, November 28, 2026
Homeदेश विदेशडिलिमीटेशन बिलावर PM नरेंद्र मोदींच ट्विट, म्हणाले, प्रत्येक अडथळा दूर केला जाईल...

डिलिमीटेशन बिलावर PM नरेंद्र मोदींच ट्विट, म्हणाले, प्रत्येक अडथळा दूर केला जाईल…

नवी दिल्ली | New Delhi
संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत देशवासियांसाठी संदेश जारी केलाय. आम्ही महिला आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिलीय. आपल्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ अपलोड करून शब्द खरा केल्याचं मोदींनी सुचवलं आहे.

देशातील नारी शक्तीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यामध्ये येणारा प्रत्येक अडथळा पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नारी शक्तीला योग्य भागीदारी देण्याची लढाई सुरू आहे. देशातील अनेक महिलांनी महिला आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक महिलांनी पत्रांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. महिला आरक्षणाबाबत महिलांच्या भावना आणि अपेक्षा समोर येत आहेत.

We had made a promise to our Nari Shakti and we remain committed to fulfilling it… https://t.co/ZT3TK71Psh— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2026

देशातील १०० टक्के महिलांचा आशीर्वाद आमच्यासोबत असल्याचा दावाही मोदी यांनी केला. महिला आरक्षणाच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर केला जाईल. हा शब्द पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत राहील. आमची जिद्द मोठी आहे आणि हिंमत कमी होणार नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar: तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो, आजही उद्याही तीच भूमिका..; रोहित पवारांचे सुचक ट्विट

महिलांना त्यांच्या अधिकारांपासून रोखण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्ष यामध्ये यशस्वी होणार नाहीत असंही मोदींनी स्पष्ट केलं. विरोध करणारे पक्ष देशातील महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू शकणार नाहीत असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. नारी शक्तीला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार मोदी यांनी या व्हिडीओ संदेशातून व्यक्त केला आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार मागे हटणार नसल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मोदी यांनी सांगितलं की विरोध करणारे पक्ष महिलांची संसद आणि विधानसभांमधील भागीदारी वाढवण्यापासून त्यांना रोखू शकणार नाहीत. महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरूच राहणार आहे.

नारी शक्तीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी या संदेशातून सांगितलं आहे. संसदेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याची केंद्र सरकारचा प्लान आहे.

ताज्या बातम्या

राज

Raj Thackeray: “सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम हलकारे देत निघाली”; राज ठाकरेंची...

0
मुंबई | Mumbaiशरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेने राजकीय भूकंप झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेला काँग्रेसकडून विरोध केला...