नवी दिल्ली | New Delhi
डिलिमिटेशन विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. इंडिया आघाडीने या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. सकाळी ११.३० वाजता या बैठकीला सुरवात होऊन जवळपास दीड तास ही बैठक चालली, ज्यामध्ये त्यांनी विरोधाच्या भूमिकेवर ठाम राहण्याची भूमिका घेत डिलिमिटेशन विधेयकामागे किती धोके आहेत, याची माहिती माध्यमांना दिली. इंडिया आघाडीच्या बैठकीला ११ पक्षांचे १९ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.
हे विधेयक लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याचं खर्गे यांनी म्हटलं आहे. शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यात आली. बैठकीला आरजेडी आणि टीएमसीसह अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हते.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या राजकीय प्रतिनिधित्वावर अन्याय होण्याची भीती
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रस्तावित विधेयकामुळे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर अन्याय होण्याची भीती व्यक्त केली आहे. लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या प्रस्तावात SC-ST समाजाच्या लोकसंख्येतील वाढीनुसार राखीव जागा वाढवण्याची स्पष्ट तरतूद नसल्याचा आरोप करत खर्गे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या विधेयकाच्या माध्यमातून लोकशाही आणि सामाजिक प्रतिनिधित्वाला बाधा पोहोचू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
आज INDIA Alliance के सभी दलों के नेताओं ने मिलकर तय किया है कि मोदी सरकार द्वारा लाया जा रहा संविधान संशोधन Bill लोकतंत्र के लिए बहुत बड़ा खतरा है। हम इसका विरोध करेंगे।
इसके पीछे कई महत्वपूर्ण कारण हैं।
- पहले इनका नारा ‘400 पार’ था। देश की जनता ने उसे विफल कर दिया। अब 850 सीटों तक लोकसभा का विस्तार करके ये हमेशा के लिए सत्ता अपने हाथों में रखना चाहते हैं।
इनका उद्देश्य लोकतंत्र को मजबूत करना नहीं, बल्कि पूरी सत्ता अपने हाथों में केंद्रित करना है।
- इस Bill में SC/ST यानी अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के हितों का ध्यान नहीं रखा गया है।
संविधान का Article 330 कहता है कि SC/ST के लिए उनकी जनसंख्या के अनुपात में सीटें आरक्षित होनी चाहिए।
जब नया Census होने वाला है, तो उसके आंकड़ों का इंतज़ार क्यों नहीं किया जा रहा है? Latest Census के अनुसार SC/ST की जनसंख्या के अनुपात में उनकी सीटें निर्धारित होनी चाहिए।
हमारा सवाल है कि सरकार अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति को उनकी आबादी के अनुसार उनका उचित Share देने से क्यों बच रही है?
- जिस चुनाव आयोग पर 10 करोड़ से ज्यादा लोगों के नाम मतदाता सूची से हटाने को लेकर गंभीर सवाल उठ रहे हैं, उसी चुनाव आयोग को परिसीमन की जिम्मेदारी सौंपी जा रही है। यह हमें स्वीकार नहीं है।
Chief Election Commissioner ज्ञानेश कुमार की निष्पक्षता पर पहले से ही गंभीर सवाल हैं। अगर उन्हीं की देखरेख में Delimitation होगा, तो उसकी निष्पक्षता की क्या Guarantee है?
किस सीट को General बनाना है, किस सीट को Reserved बनाना है, कहां महिलाओं के लिए सीट आरक्षित करनी है, इन सभी महत्वपूर्ण फैसलों में चुनाव आयोग की भूमिका होगी।
जब ‘Vote Chori’ को लेकर ही इतने गंभीर आरोप हैं, तो ऐसे में Delimitation की निष्पक्षता पर सवाल उठना स्वाभाविक है।
- असम और जम्मू-कश्मीर में किस ढंग से Delimitation किया गया, इसके उदाहरण हमारे सामने हैं।
Geography और Population के आधार पर निर्वाचन क्षेत्रों की सीमाओं में किस तरह बदलाव किया गया, General और Reserved सीटों का स्वरूप कैसे बदला गया, इसके राजनीतिक परिणाम भी हमने देखे हैं।
हमें आशंका है कि पूरे देश में इसी तरह का परिसीमन करके BJP अपने राजनीतिक हितों को साधना चाहती है।
- अप्रैल में जब सरकार यह Bill लेकर आई थी, तब उसे Two-third Majority नहीं मिली और Bill विफल हो गया।
अब TMC, NCP, शिवसेना और अन्य राजनीतिक दलों को तोड़कर अपने Numbers जुटाने की कोशिश की जा रही है। जब सरकार को लग रहा है कि शायद उसके पास पर्याप्त संख्या हो सकती है, तब वह दोबारा यह Bill लेकर आ रही है।
- एक बार पूरी सत्ता इनके हाथों में चली गई, तो ये संविधान में अपनी इच्छानुसार बदलाव करने के लिए इस बहुमत का इस्तेमाल कर सकते हैं।
हम नहीं चाहते कि भारत की संसद भी चीन की तरह ऐसी संस्था बन जाए, जहां सरकार के इशारे पर सभी हाथ उठाकर हर प्रस्ताव को मंजूरी दे दें।
हमें आशंका है कि इसके जरिए RSS-BJP हमेशा के लिए सत्ता अपने हाथों में रखना चाहती है और संविधान की जगह मनुस्मृति की विचारधारा लागू करना चाहती है।
इसीलिए हम सभी ने मिलकर इस संविधान संशोधन Bill का विरोध करने का निर्णय लिया है।
यह न SC/ST के हित में है, न देश के हित में और न ही लोकतंत्र के हित में है।
यह Amendment लोकतंत्र को जिंदा रखने के लिए नहीं, बल्कि लोकतंत्र को खत्म करने के लिए लाया जा रहा है।— Mallikarjun Kharge (@kharge) November 28, 2026
2026 मध्ये होणाऱ्या जनगणनेनुसार SC/ST च्या जागांचा विचार व्हायला हवा. तो या विधेयकात केलेला नसल्यामुळे या विधेयकाला विरोध असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले. आसाम, जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी डिलिमिटेशमध्ये कसा गोंधळा घातला हे पाहिले आहे. शिवाय याची जबाबदारी ज्ञानेश कुमार यांच्याकडे जबाबदारी देणे, आम्हाला मान्य नाही, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले.
सरकार राजकीय पक्षांमध्ये फूट पाडतेय
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की, की एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने आणलेलं विधेयक आवश्यक दोन तृतीयांश बहुमत मिळवू शकलं नव्हतं. त्यानंतर आता सरकार पुन्हा हे विधेयक आणत आहे. सरकारला विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ हवं आहे. त्यासाठी सरकार राजकीय पक्षांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली असून त्यातील खासदारांना आपल्या बाजूने वळवून संख्याबळाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे.
आरएसएस, भाजपच्या हातात संपूर्ण सत्ता येईल तेव्हा मनुस्मृती पुन्हा येईल
मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी भाजपवर गंभीर आरोप केला. सत्ता संपूर्ण हातात घेण्यासाठी डिलिमिटेशनचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. या आधी चारसो पार म्हणायचे, पुढे आठसो पार म्हणतील आणि एकदा का संपूर्ण सत्ता मिळाली की संविधानही बदलतील, असा आरोप खर्गे यांनी केला. तसेच आरएसएस, भाजपच्या हातात संपूर्ण सत्ता येईल तेव्हा मनुस्मृती पुन्हा येईल, हा लोकशाहीसमोर मोठा असल्याचे खर्गे म्हणाले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचा डिलिमिटेशनला विरोध राहणार असून हे विधेयक लोकशाहीला घातक असल्याचे म्हटले.




