Monday, September 16, 2024
Homeनगरभंडारदरा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर

भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल रविवारी शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढल्याने 11039 दलघफू क्षमतेचे हे धरण आज-उद्या पूर्ण क्षमतेचे भरण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा 10599 दलघफू झाला होता.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने 31 जुलैला भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले होते. पाणी पातळी कायम ठेऊन येणारी आवक विसर्ग सोडण्यात येत होता. त्यानंतरही 2 ऑगस्टला धो-धो पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत होता. निळवंडेतीलही पाणीसाठा 85 टक्क्यांवर गेल्यानंतर या धरणातूनही प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत होते. 3 ऑगस्टलातर प्रवरा नदीला पूर आला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला तसतसा विसर्गही कमी होत गेला. पण काल पुन्हा पावसाचा जोर काहीसा वाढला.

काल भंडारदरात दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 25 मिमी झाली आहे. पाण्याची आवक लक्षात घेता आज-उद्या हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच 11039 दलघफू होण्याची शक्यता आहे. आढळा धरणही तुडूब झालेले आहे. म्हाळुंगी नदीही वाहती आहे. भंडारदरा पाणलोटातील सौंदर्य फुलल्याने येथील निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.

मुळा पाणलोटातही पाऊस
दोन दिवसांच्या तुलनेत काल दुपारपासून हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई व अन्य भागात पावसाचा जोर काहीसा वाढला होता. त्यामुळे मुळा नदीचा विसर्ग वाढून मुळा धरणांत आवक वाढण्याची शक्यता आहे, असे कोतूळ वार्ताहराने कळवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या