Friday, December 13, 2024
HomeनाशिकDindori Loksabha 2024 : सातव्या फेरी अखेर भास्कर भगरे 'इतक्या' हजार मतांनी...

Dindori Loksabha 2024 : सातव्या फेरी अखेर भास्कर भगरे ‘इतक्या’ हजार मतांनी आघाडीवर

नाशिक | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha)(दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. अशातच आता जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेची मतमोजणीची आकडेवारी समोर आली आहे. दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात थेट लढत होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : सातव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे ‘इतक्या’ हजार मतांनी पुढे

दिंडोरी लोकसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मविआचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीत भगरे यांनी एकूण ५३८०७ मतांपैकी २३ हजार ४४३ इतकी मते मिळवत १ हजार मतांची आघाडी घेतली होती. तर पवार यांना पहिल्या फेरीत २२ हजार १८३ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीत भगरे यांनी ६ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर भगरे यांनी ही आघाडी अद्याप सातव्या फेरीपर्यंत कायम ठेवली आहे.

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : सातव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे ‘इतक्या’ हजार मतांनी पुढे

सातव्या फेरीत भगरे हे पवार यांच्यापेक्षा १८ हजार ५०२ मतांनी पुढे आहेत. भगरे यांना सातव्या फेरीत १ लाख ६८ हजार ९३९ मते मिळाली आहेत. तर भारती पवार (Bharati Pawar) यांना १ लाख ५० हजार ४३७ मते मिळाली आहेत. तर आठव्या फेरी अखेर भास्कर भगरे २३ हजार ६२७ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच नवव्या फेरीत भास्कर भगरे २५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या