Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - कर्क Quarterly Future - Cancer

त्रैमासिक भविष्य – कर्क Quarterly Future – Cancer

सौ. वंदना अनिल दिवाणे

मार्च – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी केतू, सप्तमात बुध-गुरू-शनि-प्लुटो, अष्टमात रवि-शुक्र-नेपच्यून, दशमात-हर्षल लाभात मंगळ- राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे ही,हू,हे,हो, डा,डी,डू,डे,डो अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र, तत्व-जल, खर राशी असल्याने स्वभाव चंचल, उत्तर दिशा फायद्याची. सत्वगुणी. वर्ण- ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती. राशीचा अंमल छातीवर. शुभ रत्न मोती, शुभ रंग- पांढरा, क्रिम. शुभ दिन- सोमवार. शंकराची उपासना फायद्याची. शुभ अंक- 2, शुभ तारखा- 2/11/20/29. मित्र राशी- वृश्चिक,मीन,तुला. शत्रु राशी- मेष,सिंह,धनु,मिथुन,मकर, कुंभ. अध्ययनाची आवड. जलप्रिय, भावनाप्रधान. कुशल प्रबंधक, कल्पनाशील योजना तयार करण्यात प्रविण, प्रामाणिक, भावूक, परोपकारी, ईश्वरभक्तीमध्ये रस.

अष्टमात शुक्र आहे. सासरवाडीकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता. धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा स्वकष्टावर अर्जित असावी. अवैध मार्गाचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार गोड वाटला तरी त्याचे परिणाम शेवटी विषासारखे भयंकर असतात.

स्त्रियांसाठी – स्त्रीवर्गाला अभिमानाची बाधा संभवते. पुढील कटकटी होऊ नये यासाठी सजग रहा. पतीराज खुश रहातील. त्यामुळे कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचाही सराव करा.शुभ तारखा – 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

एप्रिल – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशी पंचमात केतू, सप्तमाात गुरू-शनी-प्लुटो, अष्टमात नेपच्यून, नवमात रवि-शुक्र- बुध, दशमात हर्शल, लाभात मंगळ-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात मंगळ आहे. सांपत्तीक लाभ होतील. त्यासाटी मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. कारण त्यापैकी काही मतलबी, ढोंगी, लबाड असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगती ठेवल्यास वारंवार भांडणाचे प्रसंग येतील. इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

सप्तमात गुरु आहे.पचनक्रियेसंबंधी आजार संभावतात. गंभीर धोका नाही. योगसाधनेसाठी हा गुरू चांगला आहे. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृतधनप्राप्तीचे योग आहेत. त्याासाठी मागे लागू नये. अन्सथा असा लाभ होत नाही. दुःखी व उदास लोकांचा सहवास मिळेल. त्याचा जीवनावर परिणाम होऊ देऊ नये. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये.

स्त्रियांसाठी- शुक्र भाग्यात आहे. व्यक्तीमत्वात सौंर्द्याच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीीदशा हा जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.शुभ तारखा – 4, 5, 7, 8, 13, 17, 18, 19, 21, 22, 24, 25

मे – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी केतू, सप्तमात शनी-प्लुटो अष्टमात गुरू-नेपच्यून, दशमात रवि-हर्षल, लाभात बुध-शुक्र-शनि, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानातील रविमुळे खात्रीने महत्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना याची जास्त प्रचिती येईल. निवडणूकांच्या संदर्भात कार्यकर्ता अथवा, पुढारी यांना चांगले यश मिळेल. साधारणपणे असे समजले जाते की, अलीकडच्या काळात पिता पुत्राचे म्हणावे तसे पटणार नाही. पण तुम्हाला मात्र पितृसुख उत्तम लाभेल.

एकादशात बुध आहे. राजकृपेने लाभ होतील. इष्ट हेतू साध्य होतील. शत्रुंनादेखील गोड बोलून वश कराल. संगीताची फार आवड असेल. सभासंमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीसाठी एकादशातील बुध फार चांगला समजला जातो. त्यातून अध्यात्मिक उन्नती साध्य करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापक यांच्या विद्वत्तेचा गौरव होईल.

लाभात असलेला राहू अभिमानाची मात्रा वाढविल. अहंकाराची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी.

स्त्रियांसाठी – पती पत्नीचे आपापासात प्रेम राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नये.

विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. सध्याच्या क्लास पद्धतीमुळे बरीच धावपळ राहील.

शुभ तारखा – 1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 21

- Advertisment -

ताज्या बातम्या