सौ. वंदना अनिल दिवाणे
सप्टेंबर – 2020
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू, धनस्थानी शुक्र , तृतीयात रवि, चतुर्थात बुध, सप्तमात केतू-गुरू-प्लुटो, अष्टमात शनि नवमात नेपच्यून दशमात मंगळ- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.
तुमची रास – राशीची आद्याक्षरे का,की,कू ध,गं, छा,के,को हा अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री- पुरूष युगुल असून स्त्रीच्या हातात वीणा आणि पुरूषाच्या हातात गदा आहे. तत्व वायु असल्यामुळे अधुन मधून भडकण्याची सवय आहे. द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्यण घेता येत नाही. पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्यामुळे काही स्त्रीयांचे वागणे पुरूषी थाटाचे असण्याची शक्यता आहे.
वर्ण- क्षूद्र, स्वभाव-क्रूर, प्रकृती- त्रिदोषयुक्त. राशीचा अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न- पाचू, शुभ रंग- हिरवा, वार- बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती, अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर स्वभाव. बोलण्यात चातुर्य.
एकादशात मंगळ आहे. सांपत्तीक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. कारण त्यापैकी काही मतलबी, ढोंगी, लबाड असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगत ठेवल्यास भांडणाचे प्रसंग वारंवार येतील. स्थावर इस्टेटीसंबंधी लाभ होण्याची शक्यता आहे.
स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या स्त्रिया तुमचा हेवा करतील. सुशिक्षीत महिलांना विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.
विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुद्धीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्याना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. काहींना धाडसी प्रकारच्या खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.
ऑक्टोबर – 2020
महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयात शुक्र, चतुर्थात रवि, पंचमात बुध, षष्ठात केतू, सप्तमात केतू-गुरू-प्लुटो, अष्टमात शनि, नवमात नेपच्यून, दशमात मंगळ, लाभात हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थात रवि आहे. राजकारणी लोकांसाठी चांगला आहे. आर्थिक उत्पन्नात वृद्धी होण्यासारख्या उलाढालीत भाग घेण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेतीपासून चांगला फायदा होईल. वृद्धांसाठी हा महिना विशेष चांगला राहील. शारिरीक व्याधी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. द्राक्ष बागाईतदारांना व्यापारांद्वारे आर्थिक लाभ होतील.
सप्तमात गुरू आहे. विवाहोत्सुक तरूण-तरूणींना फार चांगला जोडीदार मिळेल. थोर लोकांची संगत प्राप्त होईल. उत्तम स्थळी प्रवास घडेल. लबाड लोकांना वश करून घ्याल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. कोर्ट कचेर्यांची कामात यश मिळवाल. पित्यापेक्षा मोठी योग्यता प्राप्त करण्याचे योग आहेत. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल गर्व वाटेल. गर्वाविषयी संयम ठेवणे आवश्यक आहे. गर्वाचे घर खाली ही म्हण लक्षात ठेवा. सुंदर वस्तुचा उपभोग घ्याल. विद्वान लोकांत मान सन्मान मिळेल.
स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनवादनादी ललित कलात प्रगती होईल.
नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी -शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकरी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र चांगले अभ्यासू असतील. शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31
नोव्हेंबर- 2020
महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थात शुक्र,पंचमात शुक्र रवि-बुध, षष्ठात गुरू-प्लुटो, अष्टमात शनी, नवमात नेपच्यून , दशमात मंगळ, लाभात हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य मिळवाल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व घराबाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल. वाहनसुख मिळेल. नवीन वाहन खरेदीचा विचार असल्यास हा महिना चांगला आहे. राजकारणी लोकांना जनतेकडून सन्मान मिळेल.
पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होतील. उपासनेमध्ये मन लागेल. मानसिक शांतता प्राप्त होईल. लेखकवर्गाला साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. गूढशास्त्रांसंबंधी आवड वाटेल. धनसंग्रह करता येईल. राजकारणी लोकांना सत्तेत वाटा मिळेल. एखादे प्रतिष्ठेचे पद मिळेल. आपल्या बुद्धीमत्तेने इतरांना चकीत कराल.
स्त्रियांसाठी –एकादशतील हर्शल अचानकपणे धनलाभ दर्शवितो. प्रयत्न केल्यास महिलांनाही नोकरी किंवा उद्योगात यश मिळू शकते. धिम्या गतीने का होईना अर्थकारण सुस्थितीत आणणे शक्य होईल.
विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थी दशा हा जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीर प्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. शुभ तारखा – 4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30