Thursday, May 2, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मिथून Quarterly future -Gemini

त्रैमासिक भविष्य – मिथून Quarterly future -Gemini

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी राहू , पंचमात रवि-बुध, षष्ठात केतू, सप्तमात गुरू, अष्टमात व नवमात नेपच्यून, दशमात मंगळ, लाभात हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे का,की, कू, घ, गं, छा, के, को, अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री-पुरूष युगुल असून स्त्रीच्या हातात वीणा व पुरुषाच्या हातात गदा आहे. राशी स्वामी- बुध,तत्त्व-वायु, असल्याने अधून मधून भडकण्याची सवय, द्विस्वभाव, राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असणे शक्य आहे. वर्ण-शूद्र, स्वभाव-क्रूर, प्रकृती – त्रिदोषयुक्त, राशीचा अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न-पाचू, शुभ रंग-हिरवा, शुभ वार- बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती, अभ्यासू वृत्ती, सरळ बुद्धी, हास्यविनोद, खेळकर स्वभाव, बोलण्यात चातुर्य.

चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील.आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल. वाहनसुख लाभेल. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा महिना शुभ आहे.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

जानेवारी – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू , षष्ठात केतू, सप्तमात रवि-शुक्र-प्लुटो, अष्टमात गुरु-बुध-शनि, नवमात नेपच्यून, लाभात मंगळ- हर्षल, व्ययात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात रवि आहे. प्रामाणिकपणामुळे व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याची शक्यता आहे. आनंदीवृत्तीला रागाचे गालबोट लागू नये याची काळजी घ्या. सन्माननीय व्यक्तीशी वाद करण्याची हौस वाटेल पण पण त्यांचा बोलण्याच्या ओघात कळत नकळत अपमान होऊ नये यावर लक्ष ठेवावे. स्त्री वर्गाशी वाद न करणे चांगले अन्यथा पराभव पत्करावा लागेल. स्पर्धेत विजय मिळेल.

षष्ठात केतू आहे. थोडी तरी नेत्रपीडा होते. भावंडाशी चांगले जमेल. शत्रुचा नाश होईल. शत्रुला समोर उभे राहण्याचे सामर्थ्य रहाणार नाही. मातुल पक्षाकडून मानहानी होण्याची शक्यता आहे. केतू असल्यामुळे वृत्ती उदार राहील. अधिकार व मोठ मोठया लोकांशी संबंध राहील. अधिकार प्राप्त होतील.

स्त्रियांसाठी -एकादशातील हर्षल अचानकपणे धनलाभ दर्शवितो. प्रयत्न केल्यास महिलांनाही नोकरी अथवा उद्योगात यश मिळू शकेल. धिम्या गतीने का होईना अर्थकारण सुस्थितीत आणणे शक्य होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या षष्ठात केतू , अष्टमात रवि-बुध-गुरू-शुक्र-शनि-प्लुटो, नवमात नेपच्यून, लाभात मंगळ-हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमात गुरू आहे. स्वास्थ उत्तम राहील. पचनक्रियेसंबंधी किंवा इतर आजार संभवतात. मात्र गंभीर धोका नाही. योगसाधनेला गुरू चांगला आहे. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृत धनप्राप्तीचे योग आहेत. पण त्याच्या मागे लागू नये. असा लाभ मिळता मिळता राहून जाईल. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये.

एकादशस्थानी मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख करा. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगती ठेवल्यास भांडणाचे प्रसंग उद्भवतील. स्थावर इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्याच दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्यास व्यवसायच्या संबंधित आलेले पाहुणे खूष होऊन समाजातील तुमची छबी उजळेल.

स्त्रियांसाठी – अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील.वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या