Tuesday, May 7, 2024
Homeभविष्यवेधबालकलावंत ते चरित्र अभिनेता...अभिनयच आयुष्यरेषा

बालकलावंत ते चरित्र अभिनेता…अभिनयच आयुष्यरेषा

4 सप्टेंबर 1952 रोजी अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म झाला. चित्रपटसृत मोठे प्रस्थ असलेल्या कपूर घराण्यातील त्यांचा जन्म. सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते राज कपूर त्यांचे वडील, कपूर घराण्यात जन्म झाल्याने जन्मतःच भाग्य घेऊन जन्माला आलेले ऋषी कपूर हे वयाच्या तिसर्‍या वर्षी रुपेरी पडद्यावर ‘प्यार हुवा इकरार हुवा’ या गाण्यात झळकले होते.

16 व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात भूमिका मिळाली. या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपटाचा सर्वोत्तम बालकलाकाराचा पुरस्कार त्यांनी पटकावला.

- Advertisement -

1973 साली राजकपूर यांनी ऋषी व डिंपल कपाडिया यांना घेऊन ‘बॉबी‘ हा चित्रपट प्रदर्शित केला. ‘बॉबी’ सुपर डुपर हिट झाला. या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी फिल्म फेयरचा ‘बेस्ट ऍक्टर’ अवॉर्ड मिळाला. आर. के. बॅनरने म्हणजे राजकपूर यांनी चित्रपटात कामाची संधी दिली पण पुढे यशस्वी कलाकार म्हणून ऋषी कपूर यांची स्वत: आपली ओळख निर्माण केली.

1973 ते 2000 सालापर्यंत त्यांनी 92 चित्रपटात काम केले. रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्धी मिळाली. खेल खेल मे, कभी कभी, सरगम, कर्ज, चांदनी आदी त्यांचे यशस्वी चित्रपट. 2000 सालापासून त्यांनी वय वाढलेले पाहून चरित्र अभिनेता म्हणून काम करायला सुरवात केली. त्यातही ते यशस्वी झाले. 2019 पर्यंत त्यांनी चित्रपटांतून प्रेक्षकांां भेटत राहीले. 2008 साली त्यांचा फिल्म फेयर लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला.

त्यांनी पत्नी नितु सिंग यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. तेही यशस्वी ठरले. त्यांचा पुत्र रणबीर कपूर आज यशस्वी अभिनेता आहे.

अनेक वादग्रस्त राजकीय व सामाजिक विधानांसाठीही ते ओळखले जातात. मीडियात कायम चर्चेत होते. नेहरू गांधी परिवारावर सातत्याने टीका केल्यानेही उलटसुलट चर्चा झाली.

बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याचा पूर्वीपासून दबदबा होता. पृथ्वीराज कपूर हे ऋषी कपूर यांचे आजोबा. ऋषी कपूर अतिशय भाग्यवान होते. आयुष्यात झगडावे लागले नाही. नशीब घेऊनच जन्माला आले. श्रीमंती, मान, सन्मान हे सर्व त्यांना वारसाहक्काने मिळाले होते. परंतु अभिनयाच्या व नृत्याच्या क्षेत्रात त्यांची मेहनतही मोठी होती. या गुणी अभिनेत्याने वयाच्या 67 व्या वर्षी 30 एप्रिल 2020 रोजी प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला. त्यांचा अभिनय मात्र स्मरणात राहील.

संचित व भाग्य

राज कपूरसारख्या मनस्वी व यशस्वी निर्माता दिग्दर्शक व अभिनेत्याच्या पोटी जन्माला येण्यासाठी पूर्वजन्मीचे संचित लागते. राज कपूर स्वतः अतिशय हुशार. त्यांनी चित्रपटातील नाट्य निर्मितीसाठी कथानकाची जुळवणी करताना जनतेची नाडी व आवड अचूक ओळखली होती. साधा, भोळा, गरीब मनुष्य त्यांनी चित्रपटात अनेक वेळा साकार केला. त्यांना संगीताची जाण होती. त्यामुळेच त्यांचे चित्रपट गाजले.

ऋषी कपूर यांना जन्मापासून अखेरपर्यंत भाग्याची साथ लाभली. आर. के. बॅनरसारख्या निर्मितीत त्यांची वर्णी लागणे हे जसे त्यांचे नशीब होते, त्याप्रमाणेच चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी मेहनतही आवश्यक होती. अभिनयाबरोबरच त्यांनी नृत्यामध्ये आपला ठसा उमटविला. धर्मेंद्र , विनोद खन्नाच्या जमान्यात त्यांनी आपली शरीरयष्टी ओळखून कधीच अँग्री मॅन पठडीतील चित्रपट केले नाहीत. रोमँटिक हिरो म्हणून ओळख निर्माण केली. उतार वयात शेवटपर्यंत अभिनय करीत होते.

संचित व भाग्य यासाठी एक उदाहरण घेऊ. सचिन तेंडुलकर ज्या तिथीला वेळेला जन्माला आला, त्या वेळेस मुबंईत आणखी बालकांनी जन्म घेतला असणार. परंतु सर्व सचिन होऊ शकले नाहीत. रामाचा सुद्धा रामनवमीला त्यांच्या जन्माच्या घटी, पळे, वेळेप्रमाणे आजच्या युगातही बालके जन्म घेतात. परंतु त्यांच्यात रामाचा लवलेश वा अंश दिसून येत नाही. म्हणूनच कुठलेही युग असू देत उत्तम व अतिशुभ संचित घेऊन जन्माला आलेले मोजके भाग्यवान लोक आपल्या पूर्वजन्मीच्या संचितावर आपले भाग्य घेऊनच जन्माला आलेले असतात.

ऋषी कपूर यांच्या हातावरील भाग्याच्या रेषा – ग्रह व त्यांचा स्वभाव

भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावत असल्याने भाग्य घेऊन जन्माला आले. हृदय रेषा व मस्तक रेषेत अंतर कमी असल्याने छोट्या छोट्या गोष्टीत टेन्शन घेण्याचा स्वभाव असतो.

आयुष्य रेषेच्या सोबत मंगळ रेषा आहे ती वयाची साठी ओलांडली तरी साथ देत असल्याने ते उर्जावान राहिले. त्यांची काम करण्याची क्षमता मोठी होती.

आयुष्य रेषा वयाच्या 67 व्या वर्षीच अंतर्धान पावली असल्याने त्यांनी या वयात इहलोकीचा निरोप घेतला.

दोनही हातावरची आयुष्य रेषा जर पूर्ण लांबीची नसेल व मंगळ रेषा नसेल तर आयुष्याचा शेवट हा त्या वयवर्षात नक्की होतो. कोणत्याही हातावरची आयुष्य रेषा पूर्ण लांबीची नसेल तर गंडांतर योग नक्की होतो.

मंगळ रेषा जर दीर्घ असती तर आयुष्याचा शेवट झाला नसता. तिने आयुष्याला संरक्षण व कवच दिले असते.

बुध रेषा उत्तम असल्याने व ती चंद्र ग्रहावरून उगम पाऊन बुध व सूर्य ग्रहामधे पोहोचल्याने हुशारी, प्रसिद्धी, मानसन्मान वारसाहक्काने मिळाला.

ऋषी कपूर यांची विवाह रेषा सामान्यपेक्षा लांब आहे, अश्या परिस्थितीत ती स्त्री व पुरुषाच्या कोणाच्याही हातावर असेल तर असे लोक आपल्या जोडीदाराकडे अतिशय बारकाईने लक्ष देतात. जोडीदाराने कसे राहावे, कोणाशी बोलावे, कसे वागावे याच्या सूचना हे वारंवार देतात. संशयी प्रवृत्ती जास्त असते.

मस्तक रेषा लांबपर्यंत चंद्र ग्रहावर उतरल्याने कलाकाराला लागणारे सर्व संपन्न गुण मिळाले.

हाताचा पंजा मजबूत, बोटे टोकाकडे गोलाकार झालेली, हातावरील सर्व ग्रह प्रमाणात गुणधर्माचे भाग्याला साथ देणारे. अंगठ्यावरील दोनही पेरे उत्तम. या सर्वांमुळे भाग्याची साथ, सारासार विचार शक्ती, हातात घेतलेले काम पूर्ण करण्याची प्रवृत्ती अंगी होती.

यामुळे ऋषी कपूर यांची एक यशस्वी कारकीर्द यांची घडली. भाग्याबरोबर प्रयत्नांची व झोकून देण्याच्या गुणामुळे ते यशस्वी ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या