Thursday, May 2, 2024
Homeजळगावभिडेवाड राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्याची चाळीसगावातून मागणी

भिडेवाड राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्याची चाळीसगावातून मागणी

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी-

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहिली शाळा भिडेवाडा हे शासनाने तत्काळ भू-संपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे, तसेच ते लवकरात लवकर विकसीत करणयाची मागणी आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समन्वयक समिती चाळीसगाव व सत्यशोधक विचार मंच चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंबंधीचे निवेदनही आज तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहोचवली, ज्या फुले दाम्पत्याने अनेक अडचणींचा सामना करून विरोध पुकारून देशात मुलींसाठी भिडेवाडा मधून शिक्षणाची दारे खुले करून दिली, आज रोजी वाड्याची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. या ठिकाणची दुरावस्था होणे, तमाम फुले शाहू अंबेडकर विचारवंत, प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक आहे.

शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी व ती जागा शासनाने भूसंपादन करून फुले शाहू अंबेडकर विचारवंत, प्रेमी जनतेला न्याय द्यावा. भिडेवाडा ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून तत्काळ विकसित करावे, ही मागणी शासनाकडे वेळोवेळी करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून शासनाने पहिली मुलींची शाळा भिडेवाडा ही जागा शासनाने भू संपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकरात लवकर घोषित करून विकसित करावे, अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आई सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समन्वयक समिती व सत्यशोधक विचार मंचचे पदाधिकारी भिमराव खलाणे, भगवान रोकडे कैलास जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान महाजन, नाना माळी, दशरथ माळी, प्रशांत खलाणे, आप्पा फिटर, शैलेंद्र सोनवणे, दिनेश महाजन, मनोज महाजन, गोविंद वाघ, सागर मोरे, कवि गौतम निकम आदि उपस्थितीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या