Friday, May 3, 2024
Homeनगरभिंगारचे निरीक्षक पाटील निलंबित

भिंगारचे निरीक्षक पाटील निलंबित

अहमदनगर (प्रतिनिधी) –

खूनाच्या गुन्ह्याचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

- Advertisement -

प्रवीण पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे भिंगार पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

भिंगारच्या काटवनात रमेश काळे या इसमाचा मारहाण व विषारी दारू पाजल्याने मृत्यू झाला होता. ही घटना चार वर्षापूर्वी घडली होती. याप्रकरणी मागील महिन्यामध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा उशिराने दाखल करण्यात आला, गुन्ह्याचा तपास करताना त्रुटी आढळून आल्याने अधीक्षक पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक पाटील यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. दरम्यान सध्या तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सानप यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. भिंगार पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या