Tuesday, November 17, 2026
HomeनगरShrirampur : भोकर फाट्यावरील कृषी गोदाम फोडून लाखांची चोरी

Shrirampur : भोकर फाट्यावरील कृषी गोदाम फोडून लाखांची चोरी

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारामध्ये श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर एका कृषी उद्योग गोदामाचे अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री शटर उचकटून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. मुख्य राज्यमार्गालगतच हा प्रकार घडल्यामुळे परिसरातील व्यावसायिक वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगत भोकर शिवारामध्ये भोकर फाट्या जवळ गट क्र. 237 मध्ये तुकाराम कांबळे यांचे मौनगिरी अ‍ॅग्रो या नावाने कृषी संबंधित बियाणे व औषधांचे गोदाम आहे. हे गोदाम अज्ञात चोरांनी शुक्रवारी (दि. 13 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास शटरचा कोयंडा तोडून व एका बाजूने शटर उचकटून फोडले. यादरम्यान गोदामातून महिंद्रा कंपनीचे 9009 वाणाचे 20 किलो वजनाचे 24 गोणी बियाणे (किंमत 43 हजार 200 रुपये), थायर कंपनीच्या 50 मिलीच्या 40 बॉटल (किंमत 42 हजार रुपये) आणि यूपीएल कंपनीच्या 150 मिलीच्या 40 बॉटल (किंमत 30 हजार रुपये), असा एकूण 1 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे गोदामाचे मालक कांबळे यांनी सांगितले.

पुन्हा तीच पुनरावृत्ती; व्यापार्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना
विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपूर्वी म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये याच कांबळे कुटुंबाच्या घरचा दरवाजा फोडून रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांचेच भोकर फाटा येथे असलेल्या दुकानाचे मागील बाजूने पत्रे उचकटून चोरी झाल्याची घटना घडली होती. या आधीच्या चोर्‍यांचा तपास लागलेला नसतानाच, आता गोदाम फोडून झालेली ही तिसरी मोठी चोरी असल्याने परिसरातील व्यापार्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Shrigonda : श्रीगोंद्यात बिंगो जुगार अड्ड्यांवर एलसीबीचे छापे

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda शहरात खुलेआम सुरू असलेल्या बिंगो जुगारामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत असल्याचे वृत्त दैनिक सार्वमतने आठ दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर स्थानिक...