Sunday, May 5, 2024
Homeनगरभोकर येथील एकाचा करोनाने मृत्यू

भोकर येथील एकाचा करोनाने मृत्यू

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एकाचा करोनाने मृत्यू झाला असून सहा जणांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असून येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे.

भोकर येथे करोनाच्या दुसर्‍या लाटेचे दुष्परीणाम जाणवू लागले असून येथील सहाजण सध्या उपचार घेत आहेत. त्यातील एकजण पंजाब राज्यात उपचार घेत आहे. सदर व्यक्ती नोकरी निमित्ताने पंजाब येथे राहत असले तरी त्यांचा मूळ पत्ता भोकर येथील असल्याने शासन दप्तरी हे रुग्ण भोकरचेच संबोधले जात आहेत. तर दोघेजण कोळपेवाडी येथे उपचार घेत आहेत.

तर येथील एकजण नेवासा येथे उपचार घेत आहे, एक व्यक्ती क्वारंटाईन सेंटरला व एक व्यक्ती आपल्या राहत्या घरीच क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गाव पातळीवर करोना कमिटीसह प्रमुख नागरिकांकडून योग्य ती दक्षता घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, सक्तीने मास्कचा वापर व सॅनिटायझर आदी खबरदारीचे उपाय करण्यासाठी जणजागृती केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या