Thursday, October 1, 2026
HomeनगरPathardi : मढी देवस्थानच्या पायथ्याशी भोंदूबाबा व महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने खळबळ

Pathardi : मढी देवस्थानच्या पायथ्याशी भोंदूबाबा व महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने खळबळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील देवस्थानच्या पायथ्याशी असलेल्या स्वच्छतागृहात मंगळवारी (दि.21) रात्री एक भोंदूबाबा व महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने भाविकांमध्ये नाराजी असून, देवस्थान प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भोंदूबाबा व महिला स्वच्छतागृहात गेल्यानंतर काही तरुणांनी त्यांना पकडले. दरम्यान, मढी देवस्थानचे माजी अध्यक्ष व सरपंच संजय मरकड यांनी देवस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घटनेची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला; मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे देवस्थानची बदनामी झाली असून, विश्वस्त व पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संजय मरकड यांनी दिला. दरम्यान, देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड म्हणाले, ‘हा प्रकार गडावर घडलेला नाही. या संदर्भात आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. काही प्रकार घडला असल्यास चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.’

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...