Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादेवरगावला आज वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन

देवरगावला आज वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

देवळाली विधानसभा मतदार संघातील देवरगाव येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलात एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या 19 कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणार्‍या शालेय मुलींचे वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आज रविवारी (दि.9) सकाळी साडे आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या शुभहस्ते होत आहे.

- Advertisement -

देवळालीच्या आ. सरोज आहिरे यांच्या पुढाकारातून या कामास 19 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे यांच्यासह आ. हिरामण खोसकर, अ‍ॅड.माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या