Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्यालॉजिस्टिक पार्क, नमामि गोदा प्रकल्प कामांचे आज भूमिपूजन

लॉजिस्टिक पार्क, नमामि गोदा प्रकल्प कामांचे आज भूमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा तसेच नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांचे ड्रीम प्रोजेक्ट ( Dream Project of Nashik Mayor Satish Kulkarni ) असलेल्या नियोजित नमामि गोदा( Namami Goda Project ) , लॉजिस्टीक पार्क ( Logistics Park )व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र या कामांचा भूमिपूजन समारंभ आज (दि.13) रविवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve ) यांच्या हस्ते होणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी नाशिक शहरासाठी नमामि गोदा प्रकल्पास दिलेल्या मान्यतेनुसार नियोजित नमामि गोदा प्रकल्प, लॉजिस्टीक पार्क व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणे कामाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे- पाटील यांच्या हस्ते व भाजप नाशिकचे प्रभारी आ. गिरीष महाजन, सहप्रभारी आ. जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वा. तर लॉजिस्टीक पार्क ट्रक टर्मिनल आडगांव, सायंकाळी 6 वा नमामि गोदा प्रकल्प व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणे- रामकुंड,पंचवटी येथे नाशिकमधील सर्व साधुमहंत समवेत होणार आहे.

तसेच आडगांव शिवारामधील ( Adgaon Shivar ) मनपा मालकीचे ट्रक टर्मिनलच्या 58 एकर जागेमध्ये लॉजिस्टीक पार्कचा तसेच नाशिक शहराची ओळख ही तिर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण भारतभर व इतर देशातही आहे. दर बारा वर्षांनी येणा-या सिंहस्थ कुंभ मेळयामुळे देखील नाशिक शहराला पर्यटनाचे वैभव प्राप्त झाले आहे.त्या अनुषंगाने नाशिक शहरात भारतातील इतर राज्यातुन व परदेशातुन देखील पर्यटनासाठी पर्यटक येत असतात.

येणा-या पर्यटकांना नाशिक शहराची एैतिहासिक, पौराणीक व अध्यात्मिकता बाबतची ओळख व्हावी तसेच पर्यटनाचे दृष्टीने नाशिक शहराचे नांव जागतीक पातळीवर उंचावणे करीता पर्यटकांना योग्य माहिती व मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक आहे.याकरिता नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळ, गंगाघाट रामकुंड ( Ramkund ) येथे पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र ( tourist guidance center ) उभारणी कामाचा भूमिपूजन समारंभ दानवे यांच्या हस्ते होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या