Friday, May 3, 2024
Homeजळगावमहावीजनिर्मिती केंद्रातील बजेट निम्म्यावर

महावीजनिर्मिती केंद्रातील बजेट निम्म्यावर

प्रकाश  तायडे : दीपनगर, ता.भुसावळ । 

राज्यातील महाविजनिर्मिती केंद्रातील यंदाचा बजेट हा निम्यावर आल्याने वीजनिर्मितीवर याचा मोठा परीणाम होणार असल्याचे चित्र आहे. त्याच प्रमाणे या वीजनिर्मिती केंद्रावर अवलंबून असलेल्या कंत्राटदार व मजूरांवर ही उपासमारीचे संकट कोसळणार आहे.

- Advertisement -

दीपनगर केंद्राला सन 2018 मध्ये संच क्रमांक 4 आणि 5 साठी वार्षिक 105 कोटी रुपयांचा तर जूना 210 संच क्रमांक 3 करीता 19 कोटींचा बजेट देण्यात आला होता. आता या वर्षी संच क्रमांक 4 आणि 5 साठी फक्त 67 कोटी रुपयांचा बजेट मुख्यालयाकडून मंजूर झाला आहे. तब्बल 38 कोटी रुपयांचा बजेट कमी केला. तर जुन्या 210 संचा करीता 14  कोटी रुपयांचा बजेट मंजूर झाला आहे. असा एकुण 43 कोटींचा एका वर्षात बजेट कमी केल्याने याचा फटका सहाजिकच वीजनिर्मितीवर होणार आहे.

येथील वीजनिर्मिती केंद्रात सद्या 500 मेगावॉटचे दोन संच कार्यान्वित आहे. तर 210 मेगावॉटचे संच क्रमांक 2 आणि 3 बंद आहे. यातील संच क्र.दोन कायमचा बंद करण्यात आला आहे.

तिसरा संच विजेची मागणी वाढली तरच सुरु होतो. बजेट मध्ये मोठ्या प्रमाणत कपात झाल्यामुळे संच चालवावे कसे म्हणून मुख्यअभियंता यांनी प्रत्येक विभागाच्या वार्षिक कामात 20 टक्के कपात करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे अत्यावश्यक कामे करावे असे सबंधित विभागाचे अधिकारी यांना सुचना दिल्या जाते आहे. मात्र याचा परिणाम कामगारांवर होत आहे.

या ठिकाणी जवळपास दोनशेच्यावर कंत्राटदार नोंदणीकत आहेत. त्यांच्याकडे परीसरातील जवळपास दोन ते तीन हजार कंत्राटी कामगार काम करतात. आधीच संच क्रमांक 1,2,3 बंद असल्याने अनेक कंत्राटी कामगार घरी बसले आहेत. आता अजून बजेट कमी करण्यात आला असल्याने अजून कंत्राटी कामगार आपोआपच कमी होतील. त्यांच्यासह कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

एमईआरसी ने दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही करीत आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या बजेटमधे वीजनिर्मितीचे संच पुर्ण क्षमतेने कार्यान्वित  आहे. आमच्याकडे जेवढा बजेट उपलब्ध आहेत. त्यामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यालयाकडे बजेट वाढवून मिळवण्यासाठी विनंती केली आहे.

– पंकज सपाटे

मुख्यअभियंता दीपनगर विज निर्मिती प्रकल्प.

- Advertisment -

ताज्या बातम्या