Friday, May 3, 2024
Homeजळगावकापूस खरेदीचा शुभारंभ

कापूस खरेदीचा शुभारंभ

भुसावळ – Bhusaval :

अद्यापपर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस जमा झाला आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत तालुक्यातील शिंदी येथील मुक्ताई जिनिंगमध्ये जिल्ह्यातील पहिले कापूस खरेदी केंद्र 9 रोजी सुरु करण्यात आले आहे.

सीसीआयतर्फे भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा येथील साई जिनिंग व चोरवड येथील सुशीला जिनिंंगसह शिंदी येथील माऊली जिनिंग हे तीन खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यात शिंदी येथे जिल्ह्यातील पहिले खरेदी केंद्र 9 रोजी अचानक सुरु करण्यात आले.

खरेदी केंद्राचे उद्घाटन शिंदी येथील शेतकरी प्रेमचंद रामचंद्र महाजन यांचा 35 क्विंटल कापूस खरेदी करुन करण्यात आली.

यावेळी सीसीआयचे केंद्र अधिकारी डी. के. नायक, मुक्ताई जिनिंगचे संचालक प्रमोद ढाके, कृउबाचे सचिव नितीन पाटील, ग्रेडर विकास पाटीदार यांच्यासह मान्यवर व शेतकर्‍यांची उपस्थिती होती. दरम्यान, खरेदी केंद्राचे केंद्र अधिकारी डी.के.नायक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

500 क्विंटल कापूस खरेदी

जिल्ह्यात सुरु झालेल्या पहिल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर पहिल्याच दिवशी 500 क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती नितीन पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील केंद्रांना लवकरच सुरुवात

दरम्यान, जिल्ह्यात अद्याप सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु झालेले नसले तरी आगामी आठवडाभरात तालुक्यातील अन्य दोन केंद्र व जामनेरसह जिल्ह्यातील अन्य कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या