Friday, May 3, 2024
Homeजळगावमध्य रेल्वेच्या मुख्य संरक्षा अधिकारीपदी आलोक सिंह

मध्य रेल्वेच्या मुख्य संरक्षा अधिकारीपदी आलोक सिंह

भुसावळ – Bhusawal प्रतिनिधी : 

मध्य रेल्वेच्या मुख्य संरक्षा अधिकारी म्हणून आलोक सिंह यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते पूर्वोत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक होते.

- Advertisement -

इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस १९८६ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या आलोक सिंह यांनी विविध विभागीय रेल्वेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे.

त्यांनी सहाय्यक परिचालन व्यवस्थापक म्हणून रेल्वेमध्ये कारकीर्दीची सुरूवात केली व वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पूर्वीचे पूर्वोत्तर रेल्वे व सध्याचे पूर्व मध्य रेल्वेमध्ये चीफ फ्रेट ट्रान्सपोर्टेशन मॅनेजर अशा अनेक पदांवर केली आहे. त्यांनी पूर्वोत्तर रेल्वे, लखनऊ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.

आपल्या प्रतिष्ठित कारकीर्दीत, त्यांनी लखनऊच्या भारतीय रेल्वे व्यवस्थापन संस्थेत प्राध्यापक आणि वरिष्ठ प्राध्यापक (लॉजिस्टिक आणि माहिती तंत्रज्ञान) म्हणूनही काम केले. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी गार्ड्स आणि संरक्षा कर्मचा-यांद्वारे वापरण्यात येणारा दिवा (एच.एस. लॅम्प) आणि टेल लॅम्पचे वैशिष्ट्यपूर्ण रचना व अंतिम रूप देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या