Friday, May 3, 2024
Homeनाशिकपिंपळगाव बसवंतमध्ये आगडोंब; तीन तासांच्या अथक प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण

पिंपळगाव बसवंतमध्ये आगडोंब; तीन तासांच्या अथक प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण

पिंपळगाव बसवंत | Pimpalgaon Baswant

येथील गवताच्या कुरनास आग लागून पंचवीस एकर कुरणासह एक हजार गवताच्या गाठी तसेच गवत बांधण्याचे मशिन जळुन खाक झाले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांच्या अंती आग आटोक्यात आली….

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत येथील जोपुळ रोडवरील पिंपळगाव बसवंत जाॅईन्ड फार्मीग सोसायटीचे गवताचे कुरण आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास कुराणातुन जाणारे विद्युत लाईनमध्ये शाॅट सर्किट झाले. यानंतर गवताने पेट घेतला.

आगीची वार्ता पिंपळगाव बसवंत अग्निशमन दलास समजताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. ओझर येथूनही एक बंब याठिकाणी दाखल झाला.

तसेच ओझर अग्निशमन दल पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे टँकर दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नाच्या अंती आग आटोक्यात आली.

या आगीत जवळपास एक हजार गवताच्या गाठी तसेच गवत बांधण्याचे यंत्र असे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. वेळीच येथील कर्मचारी आगीपासून सुरक्षित स्थानावर गेल्यामुळे जीवितहानी टळली.

- Advertisment -

ताज्या बातम्या