Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराहुल गांधींना सूरत कोर्टाचा मोठा दिलासा; जामीन मंजूर

राहुल गांधींना सूरत कोर्टाचा मोठा दिलासा; जामीन मंजूर

नवी दिल्ली | New Delhi

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटक निवडणूकांच्या रॅलीत केलेल्या वक्तव्याप्रकरणात भाजपच्या पूर्णेश मोदी यांनी बदनामीचा खटला दाखल केला होता.

- Advertisement -

कर्नाटकच्या कोलार येथील रॅलीत २०१६ च्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी सगळ्या चोरांची आडनावे मोदीच कसे असा सवाल केला होता.

झारखंडमध्ये 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

त्यामुळे मोदी आडनाव असलेल्या समाजाची बदनामी झाली असा दावा करणारा बदनामीचा खटला भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी दाखल केला होता. या खटल्यात सुरत येथील न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी २३ मार्च रोजी राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी सूरत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात (Surat Court) मोदी आडनावावरून झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात राहुल गांधी यांच्यावतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले होते.

शिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमी दाम्पत्याला आयुष्यभरासाठी आले अपंगत्व

पहिला अर्ज हा शिक्षेला स्थगितीसाठी होता. हा नियमित जामीन अर्ज आहे. तर दुसरा अर्ज हा शिक्षेला स्थगितीचा होता. राहुल गांधींचा पहिला अर्ज न्यायालयाने (Court) मंजूर केला. आता पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या दुसऱ्या अर्जावर न्यायालयाने मंजुरी दिली तर त्यांना पुन्हा खासदारकी मिळू शकते. मात्र यासाठी वेळ लागू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने जामीन मंजूर केल्याने ते तुरुंगात जाण्यापासून सध्या बचावले आहेत. तूर्तास त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या