Tuesday, February 3, 2026
Homeदेश विदेशBihar Assembly Elections 2025: बिहारमधील 'हे' ६ मतदार संघ ट्रेंड सेटर म्हणून...

Bihar Assembly Elections 2025: बिहारमधील ‘हे’ ६ मतदार संघ ट्रेंड सेटर म्हणून परिचीत; सत्ता स्थापनेत बजावतात महत्वाची भुमिका

पाटणा | Patna
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाच्या पहिल्या दोन तासांनंतर कलात सत्ताधारी एनडीएने बहुमतासह आघाडी घेतली आहे. मतमोजणी सुरू असून निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार याचे चित्र काही वेळात स्पष्ट होईल. अशातच बिहारमध्ये सध्या त्या ६ मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. या ६ मतदारसंघांनी गेल्या अनेक वर्षांपासून ट्रेंड सेट केला आहे. या सहा मतदारसंघांवर जो पक्ष किंवा युती जिंकते त्यांचेच सरकार बिहारमध्ये स्थापन झाले आहे.

साल १९७७ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून या ६ मतदारसंघाला बिहारच्या राजकारणात खूप महत्व आहे. १९७७ पासून सुरू असलेला ट्रेंड यंदापण खरा ठरेल की नाही हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. या सहा मतदारसंघांमध्ये केवटी, सकरा, सहरसा, मुंगेर, बरबीघा आणि पिपरा या विधानसभा मतदारसंघाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघांनी साल १९७७ पासून ट्रेंड सेट केला आहे. या ठिकाणी जो पक्ष जिंकतो तोच पक्ष बिहारमध्ये सत्ता स्थापन करतो.

- Advertisement -

काय सांगता हे ६ मतदारसंघ
केवटी विधानसभा मतदारसंघ –
दरभंगा जिल्ह्यातील केवटी विधानसभा मतदारसंघाचा रेकॉर्ड १०० टक्के सरकार बनवणारा ठरला आहे. २०२० मध्ये या मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता. भाजप नेतेचे मुरारी मोहन झा यांनी आरजेडीच्या फर्ज फातमी यांचा पराभव केला होता. जदयूच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांचे सरकार स्थापन झाले होते.

YouTube video player

मुंगेर विधानसभा मतदारसंघ –
मुंगेर विधानसभा मतदारारसंघाचे नाव घेतले जाते. या मतदारसंघाचा फक्त एकदाच म्हणजे १९८५ मध्ये वेगळा निकाल आला होता. तेव्हा याठिकाणी लोकदल पक्षाचा विजय झाला होता. पण त्यांचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. २०२० मध्ये याठिकाणी भाजपचे प्रणय कुमार यादव यांचा विजय झाला होता.

सकरा विधानसभा मतदारसंघ –
मुजफ्फरपूरच्या सकरा विधानसभा मतदारसंघाचे नाव देखील ट्रेंडमध्ये घेतले जाते. या मतदारसंघाचा ट्रेंड फक्त १९८५ मध्ये बदलला होता. तेव्हा याठिकाणी लोकदलचे शिवनंदन पासवान जिंकले होते. पण सरकार काँग्रेसचे स्थापन झाले होते. २०२० मध्ये याठिकाणी जेडीयू पक्षाचा विजय झाला होता.

सहरसा विधानसभा मतदारसंघ –
मिथिलांचलच्या पूर्वेकडील भागात असलेला सहरसा विधानसभा मतदारसंघ हा एक असा एक मतदारसंघ आहे याठिकाणी विजयी होणारा आमदार सत्ताधारी पक्षाचा सदस्य बनण्याचा ट्रेंड आहे. २०२० मध्ये भाजपचे आलोक रंजन झा येथून विजयी झाले होते. यावेळी ते पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आयआयपीने महाआघाडीकडून इंद्रजित गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी काय निकाल येतो हे बघणे औतस्कु्याचे राहणार आहे.

पिपरा विधानसभा मतदारसंघ –
पूर्व चंपारणचा पिपरा विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणत: सत्ताधारी पक्षाचा विजय झाला होता. पण २०१५ मध्ये याठिकाणी भाजपचे श्यामबापू प्रसाद यादव यांचा विजय झाला होता. पण सरकार महाआघाडीची बनली होती. पण नंतर नितीश कुमार भाजपसोबत आले आणि सरकार त्यांचे स्थापन केले होते. यावेळी देखील नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि ते सीपीएमच्या राजमंगल प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

बारबीघा विधानसभा मतदारसंघ –
बारबीघा विधानसभा मतदारसंघातही सरकार स्थापनेचा असाच ट्रेंड पाहायला मिळाला. जनता पक्षाने १९७७ मध्ये ही जागा जिंकली आणि त्यानंतर २००० पर्यंत काँग्रेस जिंकत राहिली. २०२० मध्ये ही जागा जेडीयूकडे गेली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....