मनमाड । प्रतिनिधी Manmad
मनमाड- नांदगाव रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोर रस्त्याने भरधाव जात असलेल्या कंटेनरने ओव्हरटेक च्या प्रयत्नात दुचाकीस धडक दिल्याने पानेवाडी येथील तरुण जागीच ठार झाला तर दोघे विद्यार्थी किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावले.सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पानेवाडी येथील तरुण गणेश रायभान कातकाडे(27) हा नांदगाव कडे दुचाकी क्र.एमएच41-बीपी 2591 वरून जात होता.रस्त्यावर उभे असलेले दोन शाळकरी विद्यार्थी देखील त्याने आपल्या दुचाकीवर बसून घेतले होते.गजानन महाराज मंदिरासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनर क्र.(एमएच16-ए वाय 99 88) ने धडक दिल्याने दुचाकी फेकली जाऊन गणेश कातकडे यास तोंडाला व डोक्याला गंभीरित्या दुखापत झाली तर मागे बसलेल्या दोघा विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या.अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी गणेश कात काडे यास रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले मात्र उपचार होत असताना त्याचे प्राणोतक्रमण झाले.
मनमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरसह चालक सतीशचंद्र जुगलकिशोर उपाध्ये(50) रा.धारावी यास ताब्यात घेतले असून अमोल कातकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.पानेवाडी येथील मृत गणेश कातकाडे हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता त्याच्या अपघाती निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा