मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ५४ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. ३० एप्रिलपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती. गुरूवारी ई-केवायसी करण्याची मुदत संपली असून आता पात्र महिलांची आकडेवारी समोर आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी शेवटच्या दिवशी लाभार्थ्यांनी अल्प प्रतिसाद दाखवला. मार्च-एप्रिल महिन्यात केलेल्या ई-केवायसीनंतर १ कोटी ८९ लाख बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. तर तर ५४ लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. मार्चअखेर हा आकडा ६८ लाख होता. एका महिन्यात १४ लाख लाभार्थींनी ई-केवायसी दुरूस्ती करताना सरकारी कर्मचारी नाही, असे स्पष्ट केले आहे.
e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात १ कोटी ८९ लाख भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, तर ५४ लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. मार्च अखेर अपात्र असलेल्या ६८ लाख महिलांपैकी १४ लाख महिलांनी एका महिन्यात आपली माहिती सुधारली आहे. यापूर्वी त्यांनी चुकून ‘सरकारी कर्मचारी आहोत’ असे नमूद केले होते, जे e-KYC करताना ‘सरकारी कर्मचारी नाही’ असे स्पष्ट केले आहे. ज्या ५४ लाख भगिनी अपात्र ठरल्या आहेत, त्यांचा या योजनेचा लाभ आता बंद होणार आहे.
लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिल असे दोन हप्ते एकत्र येतील, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. मे महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात एकत्र ३००० रूपये येऊ शकतात, असे म्हंटले जात आहे. पण अद्याप यावर सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण अथवा माहिती देण्यात आलेली नाही. या योजनेसाठी e-KYC करण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल २०२६ रोजी संपली आहे. सरकारकडून आता ईकेवायसी करण्याची मुदत वाढवण्याची शक्यता कमीच दिसत आहे.





