Friday, September 20, 2024
Homeक्राईमदारू पिण्यासाठी पैसे नसल्याने तो दुचाकींची चोरी करायचा

दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने तो दुचाकींची चोरी करायचा

कोतवाली पोलिसांकडून तरुणाला अटक || 15 दुचाकी हस्तगत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करायच्या व त्याची विक्री करून आलेल्या पैशातून दारू प्यायची,असा उद्योग सुरू असलेल्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 15 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. गंगाराम बंडू कुर्‍हाडे (वय 32 रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकातील अंमलदार काल, गुरूवारी सोनसाखळी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींची माहिती काढण्यासाठी हद्दीत गस्त घालत असताना माळीवाडा परिसरातील इंपिरीयल चौक येथे रस्त्याच्या कडेला एक संशयित तेथे पार्क केलेल्या वाहनाच्या आसपास संशयितरित्या फिरताना मिळून आला.

त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गंगाराम बंडू कुर्‍हाडे असे सांगितले. त्याच्याकडे दुचाकी चोरी संदर्भात चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की, सध्या मी काही एक कामधंदा करत नसल्याने मला दारू पिण्याकरिता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने नगर शहरातून दुचाकी चोरी केल्या आहेत. सदरच्या दुचाकी मी काही दिवस वापरून त्यातील पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत. त्यांची विक्री करण्याकरिता मी ग्राहक शोधत आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी पाच लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 15 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार राजेंद्र औटी करत आहेत.

सदरची कामगिरी निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक महेश शिंदे, उपनिरीक्षक कृष्णकुमार शेंदवाड, अंमलदार सूर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, विशाल दळवी, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, रियाज इनामदार, संगीता बडे, अविनाश वाकचौरे, सलिम शेख, सत्यम शिंदे, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अनुप झाडबुके, सचिन लोळगे, अतुल काजळे, सतीश शिंदे, सुरज कदम, तानाजी पवार, दीपक रोहोकले, राम हंडाळ, शिवाजी मोरे, राहुल गुंड्डू यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या