Friday, May 3, 2024
Homeनगरएसपी कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी

एसपी कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असतात. या चोरट्यांचे धाडस वाढले असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरून नेली आहे. या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस मुख्यालयातील कर्मचारी रमेश शांतवन साळवे यांनी फिर्याद दिली आहे. साळवे यांनी त्यांची दुचाकी (एमएच 16 सीबी 8239) अधीक्षक कार्यालयातील पार्किंगमध्ये पार्क केली होती. तेथून दुचाकी चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक जगताप करीत आहे.

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी) – विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटलच्या पार्किंगमधून एका विद्यार्थ्यांची 80 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप विठ्ठल बनवडे (वय 23 रा. पाटोदा जि. बीड) यांंनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे विखे पाटील हॉस्पिटल परिसरातील वसतीगृहात राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच 23 एझेड 9077) पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पार्किंगमधून दुचाकी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या