वावी | प्रतिनिधी Vavi
सिन्नर – शिर्डी महामार्गावर वावी येथे किशोर जाजू यांच्या हिरो शोरुम मधून अज्ञात चोरट्यांनी दि.३ नोहेंबर रोजी मध्य रात्रीच्या तीन मोटार सायकल चोरून नेल्याचा प्रकार घडला होता नेहमी प्रमाणे जाजू दि.२ रोजी सायंकाळी आपले शोरुम बंद करून आपल्या घरी रवाना झाल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास या चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत भारत पेट्रोलियम शेजारी असणाऱ्या भारत अटोमोबाईलस मधून तीन हिरो कंपनीच्या मोटार सायकलची चोरी केली , सकाळी जाजू यांच्या लक्ष्यात त्यांनी वावी पोलीस स्टेशनला संपर्क केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यावेळी मोटासायकल सह मोटासायकलच्या बॅटरी देखील चोरीस गेल्याचे चोरीस गेल्याचे पोलीस तक्रारीत म्हंटले होते नंतर सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सुर्वे व संदेश पवार यांनी गोपनीय बातमी दारा मार्फत माहिती मिळवत मुसळगाव येथील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदीप संजय रॉय रा. शंकरनगर,महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, सिन्नर यास ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता दोन साथीदार फरार असल्याचे समजले जात आहे.
यावरून गु र नं ४४०/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ (अ) ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीचा शोध घेणे कामी सहा.पो.निरीक्षक संदेश पवार ,गुन्हे शाखेकडील सहा.पो.उप निरीक्षक नवनाथ सानप, पो.ह.विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम आदींनी यावेळी विशेष कामगिरी केली आहे.