इंदिरानगर | वार्ताहर Indiranagar
खाजगी बसच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. जखमी युवकास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,वैभव गायधनी व त्याचा मित्र ऋषिकेश गायधनी( दोघेही राहणार पळसे) हे यांची मोटरसायकल एम एच 15 बी वाय 0337ने जात असताना खाजगी कंपनीची बस एम एच 15 जीव्ही5796ने नागमोडी वळणावर मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
पाथर्डी रस्त्यावरील हॉटेल स्पायसी तडका समोर संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. यात वैभव गायधनी याच्या छातीला, बरगडीस , पाठीला तसेच डोक्याच्या खाली जखम झाली असून त्याचा मित्र ऋषिकेश गायधनी याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला .
याबाबत इंदिरानगर पोलिसांना माहिती मिळतात पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संशयित बस चालक पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे .
याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस हवालदार के. आर. पवार पुढील तपास करीत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा