Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

नाशिक-पुणे बायपासवर डुबेरेकडे जाणार्‍या रस्त्याजवळ ट्रक (आयशर) व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज (दि.८) सकाळच्या सुमारास घडली.

रामदास रामकृष्ण पोटे (५०) रा. खिरविरे ता. अकोले असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोटे हे माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात कामाला असून रात्रपाळीवरुन सकाळी ते आपल्या दुचाकी क्र. एच. एच. ०५/ ए. एच. ९०८३ ने खिरविरेकडे चालले होते. यावेळी ते ठाणगावकडे जाणार्‍या रस्त्याकडे वळत असताना पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा आयशर क्र. जी. जे. १८/ बी. टी. ३१४४ ची दुचाकीला धडक बसली. यामुळे पोटे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. अचानक दुचाकी आडवी आल्याने ट्रकवरील चालकाचेही नियंत्रण सुटल्याने आयशर दुभाजकावर जाऊन पलटी झाला. त्यात आयशर चालकास किरकोळ दुखापत झाली.

महामार्ग व सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन पोटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...