Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशBird Flu: आठ राज्यांत लाखो पक्षांच्या मृत्यू, केंद्राकडून कंट्रोल रुम

Bird Flu: आठ राज्यांत लाखो पक्षांच्या मृत्यू, केंद्राकडून कंट्रोल रुम

नवी दिल्ली :

कोरोनाचा धोका संपला नसताना बर्ड फ्लूचे Bird Flu चे संकट आले आहे. देशभरात आता बर्ड फ्लूने (Bird flu crisis) थैमान घालत आहे. सात राज्यात लाखो पक्षांच्या मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने कंट्रोल रुम तयार केला आहे. त्यामाध्यमातून देशातील बर्ड फ्लूच्या प्रकारावल लक्ष ठेवले जात आहे.

- Advertisement -

अनेक ठिकाणी मेलेल्या पक्ष्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. यावरुन हे संकट आहे बर्ड फ्लूचे (Bird flu) आहे, हे आता स्पष्ट होत आहे. मध्य प्रदेशात मंगळवारी प्रशासन आणि सरकारने 15 दिवसांसाठी चिकन, अंडी विकाणाऱ्या दुकानांवर बंदी आणली आहे. मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी या प्रकरणावर तातडीची बैठक बोलबली आहे. राज्यात मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांचा नमुने चाचणीसाठी पाठवले होते त्यावेळी त्यांच्यात बर्ड फ्लूची लक्षणं दिसून आली आहेत.

देशात ८ राज्यांत बर्ड फ्लूचे थैमान

भारतातल्या ८ राज्यांमध्ये बर्ड फ्लूनं थैमान घातल आहे. हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, हरियाणात, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, गुजरातमध्येही बर्ड फ्लूने पक्षी मेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या