Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात कोट्यवधी रूपयांच्या बिटकॉईनचा अपहार

पुण्यात कोट्यवधी रूपयांच्या बिटकॉईनचा अपहार

पुणे |प्रतिनिधी| Pune

बिटकॉईन (Bitcoin) या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) (Cryptocurrency) फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्यात तपासाकरीता तांत्रिक तज्ञ म्हणून पोलिसांना (Police) सहाय्य करण्याच्या हेतूने नेमलेला सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) याना दिलेल्या डेटाचा गैरवापर करून कोट्यवधी रूपयांच्या बिटकॉईनचा अपहार (Bitcoin embezzlement of crores of rupees) केला. दरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वॉलेटवर (International and national wallet) पाठवलेले बिटकॉईन (Bitcoin) परत मिळविण्यासाठी सायबर पोलिसांनी (Cyber ​​Police) त्यांच्याकडे पासवर्डबाबत कसून चौकशी केली. याच धर्तीवर दोघांच्या कार्यालयाची आणि घरांची झडती घेण्यात आली. यात पोलिसांनी महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त (Documents Seized) केली आहेत.

- Advertisement -

पंकज घोडेच्या झडतीत तीन हार्डडिक्स, दोन टॅब, दोन लॅपटॉप, चार सिडी, सहा पेनड्राईव्ह, तीन स्मार्ट वॉच, २१ एटीएम कार्ड, दोन ओळखपत्र, चेकबुक, पासबुक, आयपॅड, डब्ल्यूडीसी कंपनीची कागदपत्रे, आठ डायर्‍या जप्त करण्यात आल्या आहेत. तर रविद्रनाथ पाटीलच्या झडतीत ४ लॅपटॉप, बारा मोबाईल, अकरा पेनड्राईव्ह, एक आयपॅड, दोन टॅब,सहा हार्डडिक्स, ९ डायर्‍या, चार डिव्हीडी, ट्रेझर वॉलेट, मेमरी कार्ड आणि एक संगणक जप्त करण्यात आला आहे.

पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) दाखल असलेल्या बिटकाईनच्या गुन्ह्यातील आरोपींकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे घोडे आणि पाटील यांनी आरोपीच्या वॉलेटवरील बिटकॉईन व क्रिप्टोकरन्सी ही विविध वॉलेटवर वर्ग केल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्या वॉलेटवर बिटकॉईन व क्रिप्टोकरन्सी वर्ग करण्यात आली आहेत त्या वॉलेटची माहिती दोघांकडून पोलिस घेत आहे. दोघांनी बिटकॉईन, बिटकॉईन कॅश, इथर अशा विविध स्वरूपातील क्रिपटोकरन्सीचा अपहार विविध वॉलेटवर केला आहे. त्याचे अनेक व्यवहार केले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, घोडे आणि पाटील यांना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी असल्याने त्यांच्या तपासात महत्वपूर्ण बाबी येण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या